मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१७

मिरर-मिरर अ टेल ऑफ टेरर - भाग १ - मराठी कथा | Mirror-Mirror a Tale of Terror - Part 1 - Marathi Katha - Page 10

दुपारी घरी आल्यावर कनिष्क सोबत पुन्हा एकदा प्रदीर्घ कामक्रीडा केल्यामुळे प्रिया अगदी थकून गेली होती, तिच्यात त्राणच उरले नव्हते. कनिष्क पुन्हा तिच्या जवळ जाताच तिने आपली असमर्थता व्यक्त केली. कनिष्कच्या रागाचा भडका उडण्यास तेवढे पुरेसे होते. त्याने तिला चांगलीच मारझोड केली. तिच्या वेदनांचा जरासुद्धा विचार न करता त्या वासनांध पिशाच्चाने तिचा जबरदस्तीने उपभोग घेतला. तिच्या नाजुक गोऱ्या शरीरावर काळेनिळे वळ उठले होते. कनिष्कचे दात तिच्या शरीरावर खोलवर रुतल्यामुळे तिथून रक्त येत होते. आदल्या रात्रीपासून सुरु असलेले कनिष्क नावाचे वासनेचे वादळ प्रियाच्या रूममध्ये नुसते थैमान घालत होते. त्या वादळात प्रियाची अवस्था एका केविलवाण्या वेलीसारखी झाली होती. ती पुरती पिचुन गेली होती. अर्धमेली होऊन ती तिच्या पलंगावर पडली होती आणि तो सैतान तिच्या शरीराचे लचके तोडत होता.

काही काळापुर्वी सुखद वाटणारा तो धुंद प्रणय, प्रियाला आता नकोसा झाला होता. ते सर्व आता तिला असह्य होत होते. कुठून या संकटात सापडले असे तिला झाले. ती पुरती फसली होती. आता यातून तिची सुटका मृत्यूच करू शकेल असे तिला वाटू लागले. होणारे अत्याचार ती निमुटपणे सहन करत होती. तो सर्व प्रकार प्रियाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर ती बेशुद्ध झाली, तरीही कनिष्क थांबला नाही तो तिच्या मृतवत शरीराचा उपभोग घेतच राहिला. प्रियाला जेव्हा जाग आली तेव्हाही कनिष्क तिच्या अनावृत्त शरीराशी खेळत होता. तिला त्याची शिसारी आली. तिने त्याला आपल्या शरीरावरुन दूर करण्याचा केविलवाणा निष्फळ प्रयत्न केला पण कनिष्कने तिला आपल्या खाली दाबून धरत धमकी दिली की जर तिने त्याची इच्छा पुरी केली नाही तर तो तिची अशी अवस्था करेल ज्याचा ती विचार पण करू शकणार नाही. आणि मग तिच्या आईची पाळी असेल.

रात्री दुकान बंद करून अमोल घरी आला तसे सुशीला बाईंनी प्रियाबद्दल वाटणारी काळजी त्याच्याकडे व्यक्त केली, “आज सकाळपासुन प्रियाचे वागणे थोडे विचित्र नाही वाटत आहे तुला? आज पहिल्यांदाच सकाळी उशिरा खाली आली. आली ती स्वतःच्याच तंद्रीत होती, गालातल्या गालात हसत काय होती! लाजत काय होती! नाश्त्याकडेही लक्ष नव्हते. दुपारीच घरी परत आली. आल्यावर जी रूममध्ये जाऊन बसली आहे ती अजुन खाली नाही आली. मी एकदा चहासाठी बोलवायला गेले तर ती आत मध्ये कोणा पुरुषाशी बोलत असल्याचे मला ऐकू आले. मी आवाज दिला तर मी आराम करतेय, मला चहा नकोय म्हणाली. मला तिच्या रूममध्ये येऊ पण दिले नाही. तिचे काय सुरु आहे देव जाणे!” यावर अमोल म्हणाला, “तु बोलतेस ते बरोबर आहे आई. आम्ही जाताना ती तिच्या रूमच्या खिडकीकडे पाहात हात हलवत होती आणि स्माईल पण करत होती, जणु कोणा जवळच्याला बाय करतेय? दुकानातही ती आपल्याच तंद्रीत होती. कामात तिचे लक्षच नव्हते. डोके दुखतंय सांगुन घरी निघून आली. काय चालले आहे मला तर काहीच कळत नाही.” “जा तिला जेवायला बोलावून आण. मी ताट वाढायला घेते.” असे म्हणुन सुशीला बाई किचन मध्ये गेल्या.

अमोल, प्रियाच्या रूमकडे गेला आणि त्याने दरवाजा ठोठावला. काही वेळाने दरवाजा उघडुन प्रिया बाहेर आली आणि तिने लगेच दरवाजा ओढून घेतला. प्रियाने पुर्ण शरीर झाकेल असा गाऊन घातला होता, जेणेकरून तिच्या शरीरावर उठलेले वळ तिच्या आई आणि भावापैकी कोणालाही दिसु नयेत. “काय करत होतीस रूममध्ये इतका वेळ?” या अमोलच्या प्रश्नावर, “काही नाही.” म्हणत ती जिना उतरण्यासाठी पुढे झाली आणि पाय मुडपल्यामुळे तिचा तोल गेला. अमोलने तिला सावरले म्हणुन, नाही तर ती जिन्यावरून गडगडत खाली गेली असती. ती खुप थकल्यासारखी दिसत होती मोठ्या कष्टाने एक एक पाऊल टाकत ती जिना उतरू लागली. तिला धड चालताही येत नव्हते. कनिष्कने आपले मुळ रूप दाखवायला सुरवात केली होती. ती नाजुक मुलगी कनिष्कचे अत्याचार कुठवर सोसु शकणार होती ते देवालाच ठाऊक.

कनिष्क प्रियाला एखाद्या खेळण्यासारखा वापरत असतो, त्याची वासना पुरवताना प्रिया पुरती पिचून निघते. वासनेचा खेळ आता तिच्यासाठी सुखद न राहता जीवघेणा होऊ लागतो. प्रियाच्या वागण्यातील बदल व तिची अवस्था अमोल आणि सुशीलाबाईंना बेचैन करते. प्रिया आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल घरच्यांना सांगते की निमूटपणे सगळे सहन करत राहते ते आता पुढे वाचुया...