MarathiMati.com - Android App on Google Play Store

लॉंग ड्राईव्ह

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २१ जून २०१५

लॉंग ड्राईव्ह - मराठी कथा | Long Drive - Marathi Katha - Page 4

हे नक्की काय गौडबंगाल आहे ते पाहण्यासाठी तो आपली कार परत घाटाच्या दिशेने वळवु लागला तेव्हा सरिताने त्याला विरोध करत कार रिसॉर्ट कडे घेण्यास सांगितले पण झालेल्या प्रकाराने प्रचंड डिस्टर्ब झालेला जय तिचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने कार वळवली आणि घाट वेगाने उतरू लागला. मगाशी एक्सीडेंट झालेल्या स्पॉट जवळ येताच भर रस्त्याच्या मधून त्यांना पांढर्‍या साडीतील एक बाई एक गाठोड कमरेवर घेऊन चालत जाताना दिसली. त्याने मोठ्याने हॉर्न वाजवला त्याबरोबर त्या बाईची केवळ मुंडी पूर्णपणे उलटी फिरली. तिच्या डोळ्यांच्या जागी फक्त खोबणी होत्या. ते भयानक दृश्य पाहुन जयने आपली कार प्रतिक्षिप्त क्रियेने डावीकडे फिरवली त्याची कार प्रचंड वेगाने संरक्षक कठडयावर आदळली. कारची विंडशील्ड तुटून तिच्या काचा रस्त्यावर विखुरल्या आणि क्षणात रेलिंग तोडून कार दरीत फेकली गेली आणि ती बाई हिडिस हसत गायब झाली.

पौर्णिमेने आणखी एक बळी घेतला होता. सकाळी जयची कार क्रेनने वर काढण्यात आली तेव्हा त्यातून जयचा मृतदेह कारचा दरवाजा कापून बाहेर काढावा लागला. त्याचे डोळे सताड उघडे होते व त्यात मूर्तिमंत भीती दिसत होती. जणू एक्सीडेंटने नव्हे तर भीतीनेच तो मेला होता. चमत्कारच म्हणायचा की सरिता वाचली होती. आठ दहा ठिकाणी फ्रैक्चर झाली होती पण जिवंत होती. तिच्या आयुष्याची दोरी बळकट होती पण जय तितका सुदैवी नव्हता. तिची साथ अर्धवट सोडून तो निघुन गेला होता आणि इकडे मात्र तो एक्सीडेंट स्पॉट वाट पाहू लागला होता पौर्णिमेच्या आणखी एका बळीची...

MarathiMati.com - Android App on Google Play Store