MarathiMati.com - Android App on Google Play Store

लॉंग ड्राईव्ह

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २१ जून २०१५

लॉंग ड्राईव्ह - मराठी कथा | Long Drive - Marathi Katha - Page 3

जय सावरला व सरिताला गाडीतच बसायला सांगून कार मधील टॉर्च घेऊन तो खाली उतरला व एक्सीडेंट स्पॉट कडे जाऊ लागला. तिथे जाऊन पाहातो तर एक्सीडेंटची कसलीच खूण त्याला दिसेना. ना तूटलेल्या काचा, ना तुटलेले रेलिंग ना गाडीचे तुटलेले पार्ट्स ना फुटलेला कठडा. सगळे जणू काही पूर्ववत झाले होते त्या कारचाही कुठे मागमुस नव्हता. जयला प्रथम काहीच समजेना. एक्सीडेंट होताना त्यानेच नाही तर सरितानेही पाहिला होता मग काहीच खुणा कशा नाही दिसत! सर्व व्यवस्थित कसे काय झाले आणि ती गाडी पण कुठे दिसत नव्हती. विचार करुन करुन त्याला वेड लागायची पाळी आली. ते खरच घडले होते, तो भास नक्कीच नव्हता, जय स्वत:लाच समजावत होता. जय परत कारकडे आला तसे सरिताने त्याला प्रश्न विचारुन भांडावून सोडले. अचानक एक्सीडेंट झालेली ती कार दरीतून बाहेर रस्त्यावर आली आणि सुसाट वेगात घाट उतरत दिसेनाशी झाली तो प्रकार पाहुन जय आणि सरिताला काय बोलावे तेच सुचेना जणू दोघांची वाचाच बंद झाली होती.

जे घडले होते ते अतर्क्य होते. तसाच थोडा वेळ गेल्यावर जयने स्वत:ला आणि सरिताला सावरले आणि घाट उतरण्यापेक्षा रिसॉर्टवर परतलेले बरे असा विचार करुन त्याने कार रिसॉर्टच्या दिशेने चालवायला सुरवात केली. अर्धे अधिक अंतर पार केल्यावर फुल स्पीड मधे मघाचची कार त्याला पास झाली ते पाहुन जयचे डोके पुन्हा चक्रावुन गेले. त्याची खात्री होती मगाशी ज्या कारचा एक्सीडेंट होताना त्याने पाहिला होता व नंतर जी कार दरीतून रस्त्यावर उतरली आणि वेगाने घाट उतरत गेली तीच कार आता त्याला पास होवून परत घाट उतरत गेली होती.

MarathiMati.com - Android App on Google Play Store