MarathiMati.com - Android App on Google Play Store

करणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २०१५

करणी - मराठी कथा | Karni - Marathi Katha - Page 6

इकडे जशी अमावस्या सुरु झाली तशी हंबीररावाची तरणीताठी मुलगी ‘कुसुम’, वेदनेने तळमळू लागली. हळूहळू तिचे सर्व शरीर पिळवटल्यासारखे वेडेवाकडे होऊ लागले, ती गुरासारखी ओरडु लागली आणि स्वतःचा ऊर बडवू लागली. तिचे डोळे गरगर फिरू लागले. हातपाय वळु लागले होते. जणु काही कोणीतरी प्रचंड ताकदीने तिला पिरगळत होते. तिच्या नाका-तोंडातून, डोळ्यातुन, कानातुन सगळीकडुन रक्त वाहु लागले. शेवटी तिला रक्ताची एक खणाणून उलटी झाली आणि तिचा खेळ संपला. तडफडून - तडफडून तिचा हंबीररावासमोरच मृत्यू झाला होता. ते पाहताच हंबीरराव धाय मोकलून रडु लागला. त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला होता पण वेळ निघुन गेली होती. त्याच्या करणीने त्याच्याच लेकीचा बळी घेतला होता. वेळीच मुठ उठल्यामुळे शंकरचा जीव वाचला होता पण हंबीररावाच्या पापाची शिक्षा बिचाऱ्या कुसुमला मिळाली होती.

काही वेळाने ‘राम नाम सत्य है’ हे स्वर हंबीररावाच्या वाड्यात घुमु लागले होते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store