जातबळी भाग ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जून २०१८
जातबळी भाग ६ - मराठी कथा | Jaatbali Part 6 - Marathi Katha
जातबळी भाग ६

“एक आई म्हणुन तू माझी काळजी करणे साहजिकच आहे. पण तू मला पण समजून घे ना! मी मरणाला भीत नाही पण नभा माझ्या आयुष्यात असणार नाही या विचारानेही मला कसेतरीच होते. मला एक समजते ते म्हणजे तुमची वेळ आली असेल तर तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही आणि वेळ आली नसेल तर कोणीही तुम्हाला मारू शकत नाही. मग कशाला घाबरायचे?” एवढे बोलून आकाश बोलायचे थांबला आणि घरात एक भयाण शांतता पसरली.

आकाशचे बोलणे लॉजिकल असले तरी आई ती आईच. ती तर आपल्या मुलाची काळजी करणारच. शेवटी आकाशच्या बाबांनी हस्तक्षेप केला. “ठीक आहे. आकाश सुखरूप आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. राहता राहिला त्या विद्येचा प्रश्न. माझा या सगळ्यावर विश्वास नाही पण आज जे काही पाहिले त्यावरून माझा हा भ्रम नाहीसा झाला आहे.”

एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही म्हणजे ती अस्तित्वातच नाही हा माझा समज आज खोटा ठरला. आपल्याला माहित नसलेल्या अनेक गोष्टींनी हे विश्व व्यापलेले आहे. विज्ञान हे अंधारात फडफडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. दिव्याचा प्रकाश जेवढा तेवढेच आपल्याला दिसते. त्या प्रकाशा पलीकडे अंधारात खुप काही लपले असू शकते आपल्यावर झडप घालण्यासाठी, ज्याची आपल्याला कल्पना पण नसते.