जातबळी भाग ४

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ मे २०१८
जातबळी भाग ४ - मराठी कथा | Jaatbali Part 4 - Marathi Katha
जातबळी भाग ४

“त्याच्या सारख्या नीच माणसाचे ऐकल्यामुळे मी तुला गमावले आकाश! किती मुर्खासारखे वागले मी? मुळात मी त्याच्यावर कधी प्रेम केलेच नाही. तुझ्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला आधाराची गरज होती आणि पुजामुळे माझ्या मनात नसताना सुद्धा मी त्याच्याशी रिलशनशिप ठेवली. त्याची मोठी किंमत पण मोजलीय मी. मला पण तू आवडायचास आकाश, पण पूजा आणि राकेशने मिळून माझे असे काही ब्रेन वॉश केले की मी काय योग्य, काय अयोग्य हेच समजू शकले नाही आणि ते जसे सांगतील तसेच करत गेले.”

“राकेशने प्रत्येक वेळी माझा फायदा उचलायचा प्रयत्न केला पण मी त्याला कधीही तसे करू दिले नाही. याचा राग त्याच्या मनात असल्यामुळे तो मला खुप काही बोलायचा, प्रसंगी हात पण उचलायचा. माझ्यासमोर इतर मुलींशी फ्लर्ट करायचा. मी हे सगळे सहन केले पण त्या दिवशी त्याने दारू पिऊन माझ्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. मी कसे बसे त्याच्या तावडीतून सुटले आणि तेव्हाच मी निर्णय घेतला की आता बास. पण त्याचा ऍक्सिडंट झाल्याचे कळले तेव्हा राहवले नाही आणि मी त्याला पाहायला हॉस्पिटलला गेले.”

“तिथे त्याच्या मित्राकडूनच कळले की ऍक्सिडंट नाही झालेला उलट तू त्याची आणि त्याच्या मित्रांची धुलाई केली आहेस. त्याने तुला मारायचा प्रयत्न केला तरीही तू त्याची पोलीस कम्प्लेंट केली नाहीस उलट त्याला बघायला हॉस्पिटलला आलास. हे पाहून जाणवले की तू किती मोठ्या मनाचा आहेस! तू त्याला मारून काहीच चुकीचे केलेले नाहीस. आज त्याने माझ्यावर हात उचलून हे दाखवून दिले की डुकराला कितीही स्वच्छ करा, कितीही सुधारायचा प्रयत्न करा पण तो जाणार शेवटी गटारातच कारण त्याची लायकीच ती असते. जाऊ दे, मला आता त्याच्याबद्दल बोलायची अजिबात इच्छा नाही.”