जातबळी भाग ३

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१८
जातबळी भाग ३ - मराठी कथा | Jaatbali Part 3 - Marathi Katha
जातबळी भाग ३

एके दिवशी खुप जोराचा पाऊस पडत होता सोबत सोसाट्याचा वारा पण सुटला होता. स्टूडेंट व्हिजिट लवकर संपवून आकाश आपल्या घरी गेला. पण बाहेरचे वातावरण पाहून नभाच्या काळजीने त्याचा जीव व्याकुळ झाला. ती घरी कशी जाईल? याच विवंचनेत तो होता. शेवटी संध्याकाळी ५.३० वाजता तो घरातून बाहेर निघाला. त्याला तशा भयंकर वातावरणात बाहेर निघताना पाहून त्याच्या आईने अडवले.

आकाश ऐकत नाही हे पाहताच त्याची आई त्याला रागावू लागली पण आकाशला डोळ्यासमोर फक्त नभा दिसत होती. आईच्या बोलण्याला झुगारून आकाश घराबाहेर पडला. विजांचा कानठळ्या बसवणारा आवाज, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि थैमान घालणारा वारा कशाचीच पर्वा न करता आकाश ऑफिसला पोहोचला. सर्वच निघुन गेले होते. नभा एकटीच ऑफिसमध्ये थांबली होती. त्याला तशा परिस्थितीत आलेले पाहून नभा आधी त्याच्यावर रागावली पण तो केवळ तिच्या काळजीपोटी आला असल्याचे लक्षात येताच तिचे मन भरून आले.

तिने त्याला घट्ट मिठी मारली. चिंब भिजलेल्या आकाशला नभाच्या मिठीतील उब चेतवू लागली. त्याने हातांच्या ओंजळीत नभाचा चेहरा धरला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले. नभाची कानशिले गरम झाली. तिच्या आयुष्यातील हे पहिले वहिले चुंबन होते. बावरली असली तरी तिला देखील ते हवे हवेसे वाटू लागले. आकाश तिच्यापासून दूर होत आहे हे पाहताच तिने स्वतःहून त्याला आपल्या जवळ ओढले आणि आता तिच्या ओठांनी त्यांच्या ओठांचा ताबा घेतला. दोघे वेड्यासारखे एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेऊ लागले. एकमेकांना घट्ट बिलगलेले ते दोघे एका वेगळ्याच विश्वात विहरत होते.