MarathiMati.com - Android App on Google Play Store

दलदल

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१५

दलदल - मराठी कथा | Daldal - Marathi Katha

“माझे नाव निशा. मी मुळची सांगलीची. घरची गरीबी, वडीलांची नोकरी गेलेली. त्यात त्यांना असलेले दारुचे व्यसन. आई लोकांकडे धुणीभांडी करते. धाकटा भाऊ पेपर आणि दुध टाकतो. मी कसे बसे ग्रॅज्युएशन पुर्ण केले. वडीलांच्या मित्राने मुंबईत नोकरी लावतो सांगुन मला इथे आणले आणि एका एस्कॉर्ट सर्विसला विकले. आधी मला काही समजलेच नाही पण तिथल्या मुलींनी मला तिथे काय चालते ते सांगितल्यावर मला धक्काच बसला. मी विरोध केला तर मला उपाशी ठेवले, ठार मारायची धमकी दिली, प्रसंगी पट्याने मारले पण”.

“काल मला एका एजंटने जबरदस्तीने हॉटेल मुन लाईट वर आणले. विरोध केल्यास माझ्या कुटुंबाला इजा पोहोचेल अशी त्याने मला धमकी दिल्याने मी त्याच्या बरोबर गुपचुप आले. एक माणुस तिथे आल्यावर तो एजंट मला त्या माणसाच्या मागोमाग हॉटेल मधील त्याच्या रुमवर घेऊन गेला. व्यवहाराचे बोलणे होताच मला सकाळी घ्यायला येतो सांगुन तो एजंट पैसे घेऊन जायला निघाला पण रुमचा दरवाजा लॉक झाला होता. काही केल्या उघडेना. मग त्या माणसाने रिसेप्शनला फोन लावला पण फोनही लागेना. अचानक त्या रूम मध्ये खुप गारवा जाणवु लागला. दिवे बंद चालु होऊ लागले. पंखा चालु नसताना पण पडदे फडफडू लागले”. बोलता बोलता निशाला घाम फुटला. तिच्या चेहऱ्यावरचे भय, ती परत त्याच अनुभवातुन जात होती हे दर्शवत होते. लेडी कॉन्स्टेबलने थोडे पाणी पाजताच निशा नॉर्मल झाली.

निशा शांत झाल्यावर पुढे काय झाले ते सांगु लागली.
“त्या रुममधले फर्निचर आपोआप हलु लागले. आम्ही तिघंही घाबरलो आणि रूम मधुन बाहेर पडायचा प्रयत्न करू लागलो पण दरवाजा काही उघडेना. अचानक कोणीतरी मला हवेत उचलले आणि मी रुमच्या एका कोपऱ्याकडे तरंगत जाऊ लागले. त्या प्रकाराने मी खुप घाबरले. माझे पाय जमिनीला लागताच मी एका सोफ्याच्या मागे लपले आणि काय घडतय ते पाहु लागले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तो माणुस वेगाने फेकला गेला आणि धाडकन बेडवर आदळला. तो उठुन बसतो तोच, आपला गळा दोन्ही हातानी धरून जोरजोरात खोकु लागला. बघता बघता तो माणुस हवेत उचलला गेला. त्याचा गळा आवळला जात असल्यासारखा तो तडफडु लागला. त्याने स्वत:ला सोडवायचा खुप प्रयत्न केला पण जी अदृश्य ताकद त्याचा गळा आवळत होती, त्या ताकदीपुढे त्याचे काहीच चालले नाही. हा प्रकार सुरु असताना तो एजंट आपल्या जवळील सुरा काढुन माझ्या दिशेने धावला. सुरा माझ्या गळ्यावर आडवा लावुन त्याने मला ढाल बनवले आणि ओरडला, “तू जो कोई भी है छोड़ उसको, वरना इसकी गर्दन चिर डालुँगा”। तो माणुस मेल्याची खात्री पटताच त्या शक्तीने त्याचे मृत शरीर बेडवर फेकले आणि हवेचा एक झोत आमच्या दिशेने झेपावला”.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store