दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

दोन -तीन दिवस गेले. मानसीशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. जर माझं लग्न मानसीसोबत नाही झाले तर तिचे बाबा तिचे लग्न दुसऱ्या कोणाशीतरी लावून देतील. डोक्यात विचारांचे वादळ उठले होते. मानसीला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करायचा विचार माझ्या मनात आला. मी मानसीच्या घराजवळ जायचो, तिचे बाबा कधी घरी असतात, कधी नसतात याचा पहारा करायचो. अशीच एक वेळ बघून मी मानसीच्या घराच्या खिडकीजवळ गेलो.
“ए, शुक शुक मानसी.”
“तू इथे काय करतोयस, बाबा येतील आता”.
“काय करू? तुझ्याशी संपर्कच होत नव्हता. तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून मी तुझ्या घराजवळ आलोय”.
“कशी आहेस तू?”
“ठीक आहे.”
“आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. आपण आज रात्री पळून जायचंय.''
“काय? पण कसं?”
“दुसरा कुठलाही पर्याय आपल्या हातात नाही आहे. आपल्याला एकत्र राहायचे असेल तर आता हेच करावे लागेल. मी जास्त बोलत नाही. तू आज रात्री अकरा वाजता मला गणपतीच्या मंदिराकडे भेट.”

मानसीला माझी कल्पना पटली. तिने लगेचच होकार दिला.