दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

“मानसीचे लग्न मी माझ्या मित्राच्या मुलाशीच करायचे ठरवले आहे.” असे म्हणून त्यांनी आम्हाला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला. मानसी खूप रडत होती. तिचे बाबा कोणाच काही ऐकायला तयारच नव्हते. आम्ही बाहेर पडताच मानसीच्या बाबांनी खाड्कन दार आमच्या तोंडावर आदळले आणि मला दाराच्या फटीतून मानसीचा रडवेला चेहरा ओझरता नजरेस आला. नकाराचा मनावर झालेला आघात घेऊन मी घरी आलो.

आता काय करायचे? याच विचारात असताना मला आईने आवाज दिला.“तू एवढा उदास होऊ नकोस, होईल सगळे ठीक.” असे म्हणून आईने मला जेवायला बसायला सांगितले.

माझी जेवायची ईच्छा नव्हती, मी जेवलो नाही तर आई सुद्धा जेवणार नाही म्हणून मी दोन घास खाल्ले. रात्री मला झोपच लागत नव्हती. मानसीच्या घरी जो प्रकार घडला तोच सारखा आठवत होता. मानसीचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. तिची खूप आठवण येत होती.