दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी मी मानसीच्या घरी जाणार होतो. मी आणि आई मानसीच्या घराजवळ पोचलो. घराबाहेर असतानाच माझी पावले थबकली. आईला माझा चेहरा बघूनच सगळे कळले.

“फार फार तर काय ते नकारच देतील ना. आपण बोलू त्यांच्याशी. होईल सगळे ठीक.” आईने मला तिच्या शब्दांनी धीर दिला.

आम्ही तिच्या घरी गेलो. चष्मा घातलेला, उंच, पिळदार मिश्या असलेला साधारण पन्नाशीच्या जवळपास असलेला एक माणूस वर्तमानपत्र वाचत होता. त्यांच्या शरीरयष्टीवरून ते मानसीचे बाबा असतील असे वाटले.

मी त्यांना “आत येऊ का?” असे विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर अनोळखीपणाचे भाव होते. त्यांनी मानेनेच होकार दिला. आम्हाला बसायला सांगितले.
“आपण कोण?” असा पहिलाच प्रश्न.

मी माझी आणि माझ्या आईची ओळख करून दिली.
“बरं. पण मी तुम्हाला ओळखत नाही.”
“तुम्ही नसाल ओळखत पण तुमची मुलगी ओळखते आम्हांला.”
मनूऽऽ मनूऽऽ मनूऽऽ
तिच्या बाबांच्या आवाजाने ती आणि तिची आई बाहेर आली.
“अहो! झालं तरी काय.”