दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

“माझे बाबा मी लहान असतानाच गेले. त्यामुळे माझी आईच माझ्यासाठी सर्व काही आहे. माझी आई माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी तिला माझ्या मनातले सगळे सांगतो. ती नेहमीच मला चांगले सल्ले देते. काही चुकलंच तर मला समजावते.”

“पण माझ्या घरी मला एवढा मोकळेपणा नाही. माझ्या घरचे एवढ्या पुढारलेल्या विचारांचे नाही आहेत. त्यांना प्रेमापेक्षा पैसा मोठा वाटतो. प्रेमासारख्या गोष्टी त्यांना थिल्लर वाटतात. आपल्या लग्नाला त्यांची परवानगी मिळणे कठीण आहे. त्यांना समजावणे कठीण आहे.” आम्ही चालता - चालताच एकमेकांशी गप्पा मारत होतो.

काहीही झालं तरीही मी तुझी साथ सोडणार नाही असा विश्वास मी तिला दिला. “सगळे काही ठीक होईल, माझ्यावर विश्वास ठेव.” असे म्हणून मी तिला बाय केले.

घरी पोचल्यावर तिचा एस. एम. एस. होता. मी सुखरूप घरी पोचले. माझा आजचा दिवस एवढा सुंदर बनविल्याबद्दल “थँक यू!”

रात्री मी तिचा एस. एम. एस. बघत तिच्या आठवणीत झोपी गेलो.