दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

तिला भेटायला आतुर झालो होतो.“काय उत्तर असेल तीच?” याचाच एकसारखा विचार करीत होतो. हाताचा हळुवार स्पर्श माझ्या खांद्याला झाला आणि मी चटकन मागे वळलो. ती मानसी होती.
“आलीस तू, केव्हापासून वाट बघतोय तुझी.”
“सॉरी अरे, खरं तर मला ऑफिसमधून निघायला उशीर झाला थोडा.”
“पण तू मला इथे का बोलावलंस?”
“समुद्र मला खूप आवडतो. समुद्राजवळ मन लवकर मोकळं होतं.”
“बोल ना.”
“तुला काही बोलायचे होते का माझ्याशी?”
“हो.”

हृदय धडधडत होतं. हृदयाच्या ठोक्यांचा आवाज बाहेर ऐकू येत होता.

“ते मी... मला... असं बोलायचे होते कि...”
“अरे बोल ना, काय झालं?”
“तू माझ्याशी लग्न करशील का?” असं मी तिला एका दमात विचारून टाकले.

ती एकटक माझ्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली.