दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

माझे डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळायला लागले. मी तिला मिठी मारून रडायला लागलो.
“मी एवढे दिवस फक्त या एकाच आशेवर जगत होतो, कि तू कधीतरी मला भेटशील.”
“मी पण तुझीच वाट बघत होते. तुझ्याच आठवणीत जगत होते.” ती मायेने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली. माझ्या डोळ्यात पाहू लागली. मी सुद्धा तिच्या चेहऱ्याला हात लावणार इतक्यात तिने माझा हात झटकला. मी आता सुंदर राहिले नाही. नको स्पर्श करू मला. ती चेहऱ्याला ओढणी बांधू लागली. मी तिचा हात पकडला व तिची ओढणी बाजूला केली.

“मी तुझ्या चेहऱ्यावर नाही तर मनावर प्रेम केलंय. आता तू ही ओढणी बांधायची नाही. ताठ मानेने वावरायचे या जगात माझ्यासोबत. लग्न करशील माझ्याशी?” मी तिला प्रपोज केलं.

हॉस्पिटलमधले कर्मचारी, सर्व रुग्ण आमच्याकडे कौतुकाने पाहत होते. मानसीने लाजतच मला होकार दिला. सगळ्यांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. सगळ्याच कर्मचाऱ्यांना खूपच आनंद झाला होता. तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मी मानसीच्या जखमा पूर्ण भरल्यानंतर तिला घेऊन घरी आलो. तिचे दुखणेसुद्धा थोडे कमी झाले. आता मी आणि मानसीने लग्न केलंय आणि आम्ही दोघेही एकेमकांबरोबर खूप खुश आहोत. ज्या लोकांनी मानसीला एवढा त्रास दिला त्यांना अटक करण्यात आले. यात मी आणि मानसीने पोलिसांची मदत केली.

माझ्या आयुष्यातली प्रेमाची व्याख्या म्हणजे मानसीचे माझ्या आयुष्यात असणे.