दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

“मी त्या रात्री माझ्या प्रियकराला भेटण्यासाठी गेले होते. आम्ही लग्न करणार होतो. ज्या रस्त्यावरून मी जात होते त्या रस्त्यावर काही माणसे दारू पित बसली होती. त्यांनी माझी छेड काढली. मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. नंतर ती माणसे माझा पाठलाग करू लागली. माझी वाट अडवून धरली व माझ्या अंगाला हात लावू लागली. मी त्यांना प्रतिकार करून तिथून कसाबसा पळ काढला. त्यांनी माझा पाठलाग सोडला नाही. त्यांनी मला गाठलेच. आधी मला खूप मारहाण केली. नंतर एकाने खिशातून ऍसिडची बाटली काढली व माझ्या आधी तोंडावर आणि मग अंगावर ओतली. मी वेदनेच्या आकांताने ओरडत होते, किंचाळत होते. ती दुष्ट माणसे मात्र माझी तडफड उघड्या डोळ्यांनी बघत होते आणि त्याचा आस्वाद घेत होते.”

ते सर्व ऐकून तर माझ्या अंगावर काटाच आला.

“मी सुद्धा त्या दिवशी माझ्या प्रेयसीला भेटायला गेलो होतो. आम्ही सुद्धा लग्न करणार होतो. पण ती आलीच नाही. खूप वाट पाहिली तिची.” आपसूकच माझ्या तोंडून हे निघाले.

“जिला भेटायला तू गेला होतास ती मीच आहे.”
“म्हणजे ती तू... मानसी...”
“हो मीच.”