दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

“तुमची परवानगी असेल तर मी तिला भेटू शकतो का?”“तुम्हांला डॉक्टरांना विचारावे लागेल. ही परवानगी तेच देतील तुला.”
आईला कधी सोडणार घरी असे विचारायला मी डॉक्टरांकडे गेलो.
“आईला तू उद्या घेऊन जाऊ शकतोस.”
“मला त्या मेडिकलच्या बाजूच्या खोलीत असणाऱ्या मुलीला भेटायचे आहे. तुमची परवानगी हवी होती.”
“भेटू शकतोस. पण त्या मुलीला जर तुझ्यामुळे काही त्रास झाला तर, तू तिला परत भेटायचे नाही.”
“हो चालेल.”

मी आईला दुसऱ्याच दिवशी घरी घेऊन आलो. संध्याकाळी पुन्हा त्याच हॉस्पिटल मध्ये गेलो. त्याच खोलीत गेलो. त्या मुलीला भेटलो. ती थोडी गांगरलीच.
तिचा चेहरा ओढणीने झाकलेला होता.
ती मला बघून रडायलाच लागली. मला कळतंच नव्हते ती का रडतेय ते?
तिचे डोळे मला मानसीची आठवण करून देत होते. ते डोळे खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत होते.

मी तिला विचारले “काय झालं?”
तिने मानेनंच नकार दिला.

मी तिला माझी ओळख करून दिली. तिच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या कमी होत नव्हते. मी तिला शांत राहायला सांगितले. तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला.

“नेमकं काय घडले तुझ्यासोबत?” असे विचारताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले.
“तुला त्रास होत असेल तर नाही सांगितलेस तरी चालेल.”
“माझंही ऐकणारं असं कुणी नाही, तुम्हाला सांगितले तर कदाचित माझं मन मोकळं होईल.”