दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

“ही मुलगी आम्हाला एका रस्त्यावर भेटली, तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. ज्या रस्त्यावर हि आम्हाला भेटली त्या रस्त्यावरून दोन बाईकस्वार जात होते. त्यांनी या हॉस्पिटल मध्ये फोन केला. त्यानंतर आमची अँब्युलन्स जाऊन तिला इथे घेऊन आली. खूपच विव्हळत होती बिचारी. तिच्यासोबत कोणीच नव्हते. खरं तर ही पोलीस केस होती, पण तरीदेखील या मुलीचे प्राण वाचावेत म्हणून तिला आम्ही अ‍ॅडमिट करून घेतली, नाहीतर तिचा जीव गेला असता. त्या मुलीवर उपचार चालू होते. शस्त्रक्रियेनंतर जेव्हा तिने स्वतःचा चेहरा आरशात पहिला तेव्हा ती किंचाळलीच. तिच्या मनावर देखील खूपच मोठा आघात झाला होता. नंतर नंतर तर ती फक्त भूक लागली तर बेल वाजवायची. एकटक कुठेतरी बघत राहायची.”

“आता तिच्या जखमा भरायला लागल्या आहेत. खरं तर ती जेव्हा बरी झाली, तेव्हा तिच्या घरी कळवले होते, पण तिच्या घरच्यांनी यायला नकार दिला. इतके महिने झाले पण अजूनही तिच्या घरचे आले नाहीत. कसे लोक असतात ना, स्वतःच्या मुलीच्या बाबतीत असे कसे वागू शकतात? ती हसत तिच्या घरी जावी असे आम्हा सगळ्यांना वाटते, म्हणून तिच्या घरच्यांची वाट बघत आहोत आम्ही.”