दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

मी आईची औषधे आणण्यासाठी हॉस्पिटलमधील मेडिकल मध्ये गेलो होतो. तिथे बाजूलाच रुग्णांची खोली होती, तिथली लोक खूप व्हीव्हळत होती. खूप त्रास होत असेल बहुतेक त्यांना. एक मुलगी तर खूपच ओरडत होती. तिचे ओरडणे माझं हृदय फाडत होतं, म्हणून मी त्या मुलीच्या आवाजासरशी तिथे गेलो. तिच्या हात - पायांची सालं निघालेली, तिच्या चेहऱ्यावरचे मांस पूर्ण जळून गेले होते, खूपच विद्रुप दिसत होता तिचा चेहरा. मी हे सगळे त्या खोलीच्या दाराआडून पाहत होतो.

मला तिथल्या सिस्टर ओरडल्या. “ह्या खोलीत दुसरे कोणी येऊ शकत नाही. तुम्ही कसे आलात? चला बाहेर... चला बाहेर...” असे म्हणून त्यांनी मला बाहेर ढकलले.
मी त्यांना विचारले, “ह्या कोण आहेत? नेमके काय झालं ह्यांच्या बाबतीत.”
“खरं तर आम्ही कोणा पेशंटची माहिती अज्ञात माणसांना देत नाही. पण तुम्ही सज्जन वाटता. कोणालाही सांगू नका हं! हे मी तुम्हाला सांगितलंय असं जर कोणाला कळले तर मला कामावरून काढून टाकतील.”
“नाही सांगत.” असे म्हणून मी त्यांचा विश्वास संपादन केला.