दाह प्रेमाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ| ६ एप्रिल २०१८
दाह प्रेमाचा - मराठी कथा | Daah Premacha - Marathi Katha
दाह प्रेमाचा

पुन्हा शून्यापासून सुरुवात करायला लागणार होती. मी त्याच ठिकाणाहून तिला शोधायला सुरुवात केली, ज्या ठिकाणी मी तिला भेटणार होतो. तिथे असणाऱ्या प्रत्येक माणसाजवळ चौकशी केली. तिथे असणाऱ्या लहान - मोठ्या अशा प्रत्येक दुकानात जाऊन मानसीचा फोटो दाखवला. पण त्या रात्री तिथे जेवढी दुकाने चालू होती तिथल्या एकानेही मानसीला साधं जातानासुद्धा पहिले नव्हते.

मी रोज घराबाहेर पडायचो. पोटाला भूक लागली कि खायचो, नाहीतर उपाशीच झोपायचो. सतत तिच्या आठवणीने डोळ्यातून आसवे ओघळायची. डोळे पुसून मी पुन्हा तिला शोधायला निघायचो. असे कित्येक महिने उलटून गेले. तरी मानसीचा काहीच पत्ता लागत नव्हता. कधीतरी माझी आणि मानसीची भेट होईल या एकाच आशेवर मी जगत होतो.

एके दिवशी माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. म्हणून मी आईला घेऊन हॉस्पिटलात गेलो. तिथल्या डॉक्टरांनी त्वरित आईला भरती करून घेतले. आईचे ब्लडप्रेशर वाढले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

“काळजी करू नका. तुमची आई लवकरात लवकर बरी होईल.” असे डॉक्टरांनी सांगितले.