चांदण्यात फिरताना

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना - मराठी कथा | Chandanyat Phirtana - Marathi Katha - Page 5

अश्याप्रकारे त्या दोघांची चांगली friendship झाली होती. ६ महिने झाले त्यांच्या friendship ला. स्मिता त्याच्या प्रेमात पडली होती. पण ती यश कधी विचारतो आहे याची वाट पाहत होती. मग तिनेच ठरवलं कि आपल्या आई - वडिलांना यश बद्दल सांगायचे. तसं तिने सांगितलं ही. तिच्या आई - वडिलांना काहीच हरकत नव्हती. यश काही विचारत नाही मग आपणच त्याला विचारूया लग्नाचं, असं तिने ठरवलं. त्यादिवशी ती ठरवूनच गेली हॉस्पिटल मध्ये. संध्याकाळ कधी होते आहे याची वाट पाहू लागली. झाली एकदाची संध्याकाळ आणि निघाली ती यशला भेटायला. थोडयाच वेळात यशही आला.
“तुला एक गोष्ट आज मला सांगावीच लागेल”.
“कोणती गं?”
“तू येण्याअगोदर मोगऱ्याचा छान सुगंध येतो. नक्कीच तो फुलांचा नसावा. कारण एवढया लांबून सुद्धा फुलांचा सुगंध नाही येणार.”
“ते एक सिक्रेट आहे.”
“सांग ना रे.”
“अगं सिक्रेट वगैरे काही नाही. आमच्या गावात कपडे धुण्यासाठी साबण मिळतो ना, त्याचा वास मोगऱ्याचा आहे, इतका strong आहे कि तो सुवास दिवसभर राहतो. त्यामुळे अत्तर लावायची गरजच नाही.” स्मिताने पुढे येउन त्याच्या शर्टचा वास घेतला.
“हो रे, मला पण घेतला पाहिजे तो साबण.”
“चल, पहिलं घरी तर जाऊ.” असं बोलून त्याने चालण्यास सुरुवात केली.
“तुला एक विचारू का यश?”
“विचार ना.”
“लग्न करशील माझ्याशी?” तिच्या प्रश्नाने यश जागीच थांबला.
“बोल ना काहीतरी. उत्तर हवं आहे मला.” स्मिता एकटीच बोलत होती.
“चल, आपल्याला उशीर होतो आहे.”
“थांब ना. उत्तर दे ना मला.”
“काय उत्तर हवं आहे तुला. आपल्याला अजून एकमेकांना समजायला पाहिजे ना. लगेच लग्न कुठे काढलसं तू आणि मी तुला चांगली मैत्रीण मानतो. माझ्या मनात तसं काहीच नव्हतं शिवाय माझ्या आणि तुझ्या घरी पण सांगावं लागेल ना.”
“माझ्या घरी सांगितलं आहे मी. तू तुझ्या घरी जाऊन विचार. नाहीतर मी माझ्या पप्पांना बोलावू का बोलणी करायला?”
“नको, थांब जरा. घाई नको. मलाही विचार करू दे जरा.” तोपर्यंत त्याची वाट आली होती.
“चल bye.”
“मला promise कर. उद्या मला उत्तर देशील. नाहीतर मी जाणारच नाही घरी.”
“हो बाबा, तुला उद्या नक्की सांगतो हा. आता घरी जा.” आनंदातच स्मिता घरी पोहोचली.

पूर्ण दिवस ती हवेतच होती. संध्याकाळची वाट पाहत होती ती आणि यशचा होकार कधी ऐकते आहे असं तिला झालं होतं. संध्याकाळी वेळेत पोहोचली ती. यशची वाट बघत उभी होती कधीची. “आज खूप वेळ झाला यशला. रोज ७.३० ला येणारा. ८ वाजले तरी आला नाही”. काम असेल बहुतेक त्याला घड्याळात ९ वाजले तेव्हा ती निघाली. पुढच्या दिवशीही तेच झाले. यश काही आला नाही. असाच आठवडा गेला. यशचा काहीच पत्ता नाही. “कुठे गेलास रे मला सोडून. काय चूक केली मी.” एकटीच बसून स्मिता रडत बसली होती त्याच दिव्याखाली. ५ - १० मिनिटं गेली. थंड हवेची झुळूक आली. पण, मोगऱ्याचा सुगंध नाही आला कि यश नाही आला. तशीच रडत होती ती. अचानक कुठे गेला यश.

संबंधित उपयुक्त लेखन/दुवे