चांदण्यात फिरताना भाग ६

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग ६ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 6

“हं, सरिता इकडेच राहते का?” सरिताच्या घरी जाऊन स्मिताने प्रश्न केला."
“हो, आपण कोण?”
“मी स्मिता.” पुन्हा ती खोटं बोलणार होती.“मी यशची मैत्रीण आहे. college मध्ये होती त्याच्या. त्याचा पत्ता नाही मिळाला मला. सरिताचा भेटला तिच्या हॉस्पिटल मधून.”
“पण सरिता राहत नाही इकडे.”
“मग कुठे राहते ती?”
"तुम्हाला काय करायचं आहे तिचं?” अशी तिची आई बोलली आणि घरात आत निघून गेली. स्मिताला काय बोलायचं तेच कळलं नाही. तेवढयात एक मुलगा बाहेर आला.
“Sorry, माझी आई बोलली त्याबद्दल माफी मागतो मी.”
“It's OK. पण त्या असं का बोलल्या? काही प्रोब्लेम आहे का?”
“सरिता हॉस्पिटल मध्ये असते.”
“हो. मला माहित आहे ती डॉक्टर आहे ते.”
“डॉक्टर होती ती, आता नाही आहे. हॉस्पिटल मध्ये treatment चालू आहे तिची.”
“का? काय झालं तिला? बरं नाही आहे का तिला?”
“तिची मानसिक अवस्था बरोबर नाही म्हणून तिला Psychiatrist कडे admit केले आहे.” हे ऐकून स्मिताला shock च बसला.
“कसं काय झालं नक्की?”
“नक्की काय झालं मलाही माहित नाही. मी तेव्हा पुण्याला होतो. यशबरोबर हीचं लग्न ठरलं ठरलं होतं. यशही तिच्या हॉस्पिटलच्या बाजूच्याच कंपनीत होता. लग्नाला २ दिवस बाकी असताना अचानक तो कुठेतरी निघून गेला. तेव्हाही ती चांगलीच होती. पण ४ दिवसानंतर काहीतरी घडलं तिकडे त्यामुळे सरिता बेशुद्धच होती. चार दिवस तरी ती शुद्धीवर नव्हती. नंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हापासून ती वेडयासारखी करायला लागली. म्हणजे इतकी वेडी की कोणालाच तिला control करता येत नव्हतं. तेव्हापासून ती हॉस्पिटल मध्ये आहे.”
“अरे बापरे! इतकं सगळं झालं. आता कुठे असते ती?”
“कोल्हापूरला कुंभार गाव आहे. तिकडून जरा पुढे गेलं तर ‘आधार’ नावाचं हॉस्पिटल आहे, तिकडेच होती ना ती डॉक्टर म्हणून. त्याच्या मागेच त्यांचच एक मनोरुग्णाचं हॉस्पिटल आहे. तिकडे असते ती. माझे पप्पा सुद्धा त्याच गावात राहतात हल्ली, तिची देखरेख करण्यासाठी.”
“आणि यश? त्याचा काही पत्ता नाही लागला का?”
“नाही. त्याचे घरचे सुद्धा काही नीटसं सांगत नाहीत तो कुठे आहे ते. मग आम्हीही त्यांच्याशी संबंध तोडून टाकले.” काय करायचं आता. स्मिता विचार करत होती.
“तुम्हाला यशचा शहरातला पत्ता हवा असेल तर देतो मी.”
“हो.. हो.... नक्की.” असं म्हणून तिने यशचा शहरातला पत्ता मिळवला.
“आणखी एक, यश संबंधी काहीही माहिती मिळाली तर मलाही सांगा, माझ्या बहिणीची अवस्था त्याच्यामुळे झाली आहे, मला जाब विचारायचा आहे त्याला.”
“नक्की कळवते तुम्हाला.” असं म्हणत स्मिता घराबाहेर पडली.