चांदण्यात फिरताना भाग २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ डिसेंबर २०१५

चांदण्यात फिरताना भाग २ - मराठी कथा | Chandanyat Phirtana Part 2 - Marathi Katha - Page 5

त्यांनी दिलेल्या पत्तावर ती पुन्हा गावात आली, तिच्या सरकारी क्वॉर्टर्स पासून अर्ध्या तासावर ‘धर्माधिकारी’ असं पाटी लावलेलं एक मोठ्ठ घर होतं आणि घराला मोठ्ठं कुलूप. आजूबाजूस चौकशी केल्यावर कळलं कि त्याचं नाव होते यशराज धर्माधिकारी. तो आणि त्याचं कुटुंब राहायचं येथे. दोनच वर्षापूर्वी ते घर सोडून कुठेतरी शहरात गेले राहायला. आता काय करायचं. सगळे रस्ते बंद झाले. कुठे शोधायचं यशला? अचानक तिला आठवलं. त्यांनी सांगितलं होतं सरिता नावाची डॉक्टर होती त्यांच्याच हॉस्पिटल मध्ये. स्मिता लगबग करतच पोहोचली हॉस्पिटलमध्ये.
“काय झाल गं? काही मिळाली का माहिती यशची?” स्मिताच्या मैत्रिणीने तिला विचारलं.
“अगं, त्याचं घर सुद्धा आहे गावात. पण ते गेले घर सोडून २ वर्षापूर्वी.”
“हे कसं शक्य आहे? मग तो तुला कसा काय भेटायचा?
“मला काहीच कळत नाही, पण काहीतरी नक्कीच मोठ्ठी गडबड आहे.”
“आणि तू काय शोधते आहेस इकडे?”
“अगं, त्याच्या जुन्या बॉसने पत्ता दिला मला आणि त्याच्या बायकोची माहिती सांगितली.”
“त्याचं लग्न झालेलं होतं?”
“नाही गं होणार होतं. पण ती इकडेच डॉक्टर होती असं त्यांनी माहिती दिली. तिचा पत्ता तर भेटेल ना.” तेव्हा तिची मैत्रीण पण शोधायला लागली. खूप शोधल्यानंतर एका जुन्या फाईल मध्ये तिची माहिती मिळाली फोटो सहित.
“तिची लास्ट entry पण १० वर्षापूर्वीचीच आहे गं. हिची माहिती पण नाही मिळणार इथे.” स्मिताने तिचा पत्ता बघितला.
“अरे!” स्मिता ओरडलीच जवळपास.
“काय झालं गं?” तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं.
“अगं, ही तर मी राहते तिथे रहायची, सरकारी क्वॉर्टर्स मध्ये. हे बघ.”
“हो गं. पत्ता तर तोच आहे.” स्मिताने तिचा शहरातला पत्ता बघितला, मुंबईतला होता तो.
“आमच्या मुंबईतल्या घराच्या बाजूलाच आहे घर हिचं. स्मिताने पत्ता लिहून घेतला आणि तडक शहरात पळाली. एव्हाना स्मिताने तिच्या घरीसुद्धा हे सगळं प्रकरण सांगितलं होतं. त्यांनाही त्याच आश्चर्य वाटलं होतं.