पाश गळ्यातील तुझा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ मे २०१०

पाश गळ्यातील तुझा - मराठी गझल | Paash Galyatil Tujha - Marathi Ghazal

पाश गळ्यातील तुझा, सोडवू कसा मी ?
श्वास मनातील तुझा, जोजवू कसा मी ?

साथ तुझी ती, मजला आज रे हवीसी
गंध फुलातील तुझा, ओजवू कसा मी ?

आज तुझ्या त्या सहवासात मी बुडालो
थंड तुफानास अता, टोलवू कसा मी ?

आज जरा मी हसवूनी मला मिळालो सांग तुझी प्रीत जरा योजवू कसा मी ?

दुःख अकाली मजला साद देत आहे
दुःख क्षणाचे सलते, थोपवू कसा मी ?