MarathiMati.com - Android App on Google Play Store

तांडा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ मार्च २०१०

तांडा - मराठी लेख | Tanda - Marathi Article

कोणत्या वाटेवरी हा चालला तांडा सये..
कोणती हुर-हुर चाले वादळी नजरेसवे..

सांस्कृतिकतेचाच कळप हा, कळपा-कळपाने तांडा होत जातो! कसा?

तांड्यातील प्रत्येक संस्कृतीवीर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेला असतो आणि पी.एच.डी साठी तांड्यात सांस्कृतिक सहकाराची धडपड सुरू असते.

या तांड्यात अनेक घडामोडी होत असतात, घडामोडी घडविल्या जात असतात. त्यातही सांस्कृतिकतेचेच हित असते.

अज्ञानाने झपाटलेले काही विद्रोही तांड्यातून बाहेर फेकले जातात, त्यांचा निरोप समारोह तांड्यातील पी.एच.डी प्राप्त संस्कृती रक्षक मोठ्या जल्लोशात साजरा करतात. अन्‌ तांडा पुढे-पुढे चालत जातो.

नेमलेल्या ठिकाणाहून अनपेक्षीत प्रदक्षिणेसाठी पुढे-पुढे जाणे म्हणजे ज्या ठिकाणाहून निघालो त्याच ठिकाणी ‘नविन कपडे’,‘गंध’,‘लाली’,‘पावडर’ लावुन मध्यांतर झाल्याची घंटा संपण्यापुर्वी पोहोचणे असते या शुल्लक अर्धसत्यास मान्यवर पुर्ण महत्व देत नसतात. तांड्याची वाटचाल निशंक सुरू असते.

पुढे... तांड्यातील कळपांचे रंगांच्या सहाय्याने विविध कप्पे केले जातात, प्रत्येत कप्प्यातील कळप व्यवस्थीत छोट्या-छोट्या डब्यांत बसविले जातात. त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था त्यांच्या कप्प्यांच्या रंगाहून कर्तव्यदक्ष स्वयंसेवक सावकाश करीत असतात. तांडा आता पुन्हा प्रवास सुरू करतो.

तांड्यातील कळपांची संख्या हळू-हळू वाढत जाते. कालांतराने ‘कळपाच्या एकात्मतेसाठी’ या विषयावर तांड्यातील अनेक ‘संस्कृतीवीर’(कार्यकर्ते) पी.एच.डी घेवुन बाहेर पडतात, नविन तांडा सुरू करतात, नविन कळप एकत्र आणतात.

कळपांची सांस्कृतिक एकात्मता दिवसेंदिवस कार्यक्षम होत जाते.
तांडा पुढे-पुढे चालत जातो, न थांबता अगदी निशंकपणे.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store