Download MarathiMati.com's New Android App from Google Play

स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 8

विविध क्षेत्रात मुली ठामपणे पाय रोवून उभ्या असल्याचे चित्र आज आहे. त्यामुळे आजच्या मुली कसा विचार करतात, असे मनात येते. त्यापैकी हे एक उदाहरण
सभोवताली अंधार आणि दृष्टी असुनही अंध असलेल्या समाजात त्यांनी त्यांना स्वीकारले, केवळ स्वीकारूनच त्या थांबल्या नाहीत, तर प्रेम आणि जिद्दीतुन त्यांच्या अंधारातही प्रकाशमय संसार फुलविला. दृष्टिहितांना पति म्हणून स्वीकारुन या स्त्रीयांनी नवसमाजाची निर्मिती केली. राज्यात असे असंख्य संसार आहेत. त्यापैकी हे एक बदलापुर येथील वैशाली शिंदे यांनी तर अंध तरुणाशी प्रेमातून आंतरधर्मीय विवाह करून वेगळेच विश्व निर्माण केले. शाळेत नोकरी करत असतांना त्यांची मजहर शेख यांच्याशी ओळख झाली. त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. विवाहाला दोघांच्याही घरातून सुरवातीला विरोध होता. मात्र नंतर तो मावळला. आजही ते दोघे संगीताचे क्लास घेतात. त्यांना एक मुलगा आहे. ‘हिंदू-मुस्लिम’ आंतरधर्मीय विवाह असल्याने लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. मला स्वतःला असे वाटतच नाही की, “माझा नवरा हा अंध आहे. अंध असूनही मला सतत नवी दृष्टी ते देत असतात”. असे त्या अभिमानाने सांगतात.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play