स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 6

अधिकारांविषयी जागरूकता १९८१-१९९०
कुटुंबात व समाजात स्त्रियांना सामोर जाव्या लागणाऱ्या ज्वलंत प्रश्नांच चित्रीकरण या कालखंडात मोठ्या प्रमाणावर झालं. ‘अंकुर’, ‘दृष्टी’ ‘अर्थ’, ‘जीवनधार’, ‘मिर्च मसाला’ आदी समांतर सिनेमांतून तिच्या अगदी व्यक्तिगत प्रश्नांवर थेट प्रकाश टाकण्यात आला. याच काळात स्त्री आपल्या अधिकाराविषयी रस्त्यावर येऊन भांडतानाही दिसली. झीनत अमान, परवीन बॉबी आदी अभिनेत्रींनी आधुनिक स्त्रीची वेगवेगळी रूपं याच काळात पेश झाली. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या स्त्रीचे अनेक प्रश्न या काळातील चित्रपटानं मांडले.