MarathiMati.com - Android App on Google Play Store

स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 5

स्त्रीप्रधान चित्रपटाची लाट १९६८-८०
सतीपट संपले तरी स्त्रीच्या साध्वीपणाचा सिलसिला सुरूच राहिला. त्याचा पगडा जनमाणसावर बरीच वर्षे राहिला. ‘सतीपरीक्षा’, ‘दुल्हन’, ‘चरणों की दासी’, ‘मै सुहागन हूँ’, ‘सुहागन’, ‘पतिपरमेश्वर’ ही काही उदाहरणं. त्याच काळात प्रेमात पडलेल्या स्त्रिया व प्रेम निभावताना त्यांना करावा लागलेला संघर्षही चित्रित केला गेला. ‘संगम’, ‘साहब’, ‘सुजाता’ व ‘ब्रम्हचारी’ या चित्रपटातून ती प्रगल्भ होत गेली. सत्तरच्या दशकानंतर स्त्रीप्रधान चित्रपटांची लाटच आली. त्यात हेमामालिनीचा ‘सीता और गीता’, ‘बॉबी’, ‘गुड्डी’ व मराठीतील ‘उंबरठा’ हे चित्रपट उल्लेखनीय ठरले. स्त्री उंबरठा ओलांडून बाहेर पडल्याचा हा काळ होता.

MarathiMati.com - Android App on Google Play Store