स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 4

आईची व प्रेमाची महती १९५७-६७
या दशकाच्या सुरवातीला प्रदर्शित झालेल्या ‘मदर इंडिया’ या मेहबूब खान दिग्दर्शित चित्रपटाने आईची महती गायली. नर्गीस दत्त यांच्या अविस्मरणीय अभिनयानं हा चित्रपट गाजला. जन्मभुमी व आईची तुलना करणारा हा चित्रपट स्त्रीला खुप मोठं करून गेला. मीनाकुमारी व गुरुदत्त यांच्या साहब, बीबी और गुलाम या चित्रपटातून स्त्रीच्या अनेक व्यथांच चित्रीकरण करण्यात आलं. जिवापाड प्रेम केलेला राजकपूरनं ‘अनाडी’ व ‘संगम’ या चित्रपटातून स्त्रीची नानाविविध रूपं दाखविण्याचा प्रयत्न केला. दिलीपकुमार-वैजंतीमालाच्या ‘मधुमती’ या चित्रपटानं स्त्रीच्या प्रेमाला आणखी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.