स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 3

स्त्रीपटांचच राज्य १९४८-५६
या काळात अन्यायाचा प्रतिकार करणारी बाई स्वातंत्र्य मिळेपर्यंत अचानक बदलली या काळात स्त्री पटांनी चित्रपट सृष्टीवर राज्य केले. सती पार्वती, सती अनुसया, सती सावित्री, सती सिता, सती नर्मदा हे चित्रपट त्यांच बोलकं उदाहरण. नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून स्त्रीया उपवास करतात. वटपौर्णिमा, करवाचौथ, शिवरात्र आदींच चित्रण आणि उदात्तीकरण या चित्रपटातून पाहायला मिळेल.

देवदास, भाभी की चुडिया, सीमा व मिस्टर और मिसेस ५५ या चित्रपटातून तिचं प्रेम, संघर्ष व बिनधास्त रूपही पाहायला मिळालं. भाभी की चुडिया सारख्या चित्रपटातून संसारामध्ये रमलेली स्त्री दाखविण्यात आली.