Download MarathiMati.com's New Android App from Google Play

स्त्री शक्तीला सलाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ नोव्हेंबर २०१०

स्त्री शक्तीला सलाम - मराठी लेख | Stree Shaktila Salam - Marathi Article - Page 2

स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत कमी नाही. पारंपारिकरित्या पुरूषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनिता विल्यम्‌स, अंजु जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवत आहेत. तसेच पोलिस, लष्करी दल याबरोबर, रिक्षा, ट्रक चालविणे, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बसे कंडक्टर, पत्रकारिता, फायरब्रिगेड ही क्षेत्रे सुद्धा महिलांनी काबीज केली आहेत.

सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत. आताच राष्ट्रकूल स्पर्धामध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे. सध्या राष्ट्रीय राजकारणांत महिलांची संख्या नगण्य आहे. आर्थिक क्षेत्रातही अनेक महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहे. संशोधन क्षेत्रातही महिलांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे.

त्याचप्रमाणे समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडते असं म्हणतात. चित्रपट हे माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकतं. काळाबरोबर चित्रपटातील नायिका बदलत गेली. विशेष म्हणजे चित्रपटातील हे बदल समाजामध्ये स्त्रीनं घडवून आणलेल्या बदलांच प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्यापूर्वी ‘फिअरलेस’ १९१३-४७ एक स्त्री अन्यायाचा प्रतिकार करीत, गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत होती. टारझन, जेम्स, बॉंड, रँबो यांनीही मान खाली घालावी असं तिच कर्तृत्व होतं. ‘फिअरलेस नादिया’.. पळत्या टांग्यात उडी मारणं, तलवारबाजी, भालाफेक, पळ्त्या रेल्वेतून उड्या मारणं असे तिचे अचाट कृत्य स्त्रीच्या नाजुकपणाच्या सर्व कविकल्पना या स्त्रीने तलवारीच्या एका फटक्यात उधळून लावल्या. त्या काळात अहिल्या उद्धार (१९१९) सारखे काही स्त्री प्रधान चित्रपटही बनले. मात्र स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभुमीवर तिचा दुर्गावतारच अधिक अधोरेखित झाला.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play