मृत्यू - एक अटळ सत्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ मार्च २०१५

मृत्यू - एक अटळ सत्य | Mrutyu - Ek Atal Satya

जन्मावर जितकं प्रेम करता, तितकंच प्रेम मृत्यूवरही करा म्हणजे आयुष्य आणखी सुंदर होईल.

“मृत्यू एक अटळ सत्य” तुम्ही माना अथवा न माना पण जसा जन्माचा आनंद आहे, तसा मृत्यूचाही असला पाहिजे. मी असं का म्हणते ते तूम्हाला आता पटणार नाही. पण हा लेख वाचलात की कळेल. अहो जन्माला आलेल्या जिवाचं मृत्यूचं तिकिट आधीच Booking झालेलं असतं, फक्त ती तारीख विधात्याच्या डायरीत नोंद असते. प्रत्येक माणूस हा “जन्माच्या स्टेशनवर मृत्यूचं तिकिट काढून आयुष्याच्या गाडीने प्रवास करीत असतो.”

माझं हे म्हणण्यामागचा हेतू असा की अहो, जरं पानगळ झालीच नाही तर नवीन पालवी कशी येणार, तसेच जर “मृत्यू नसेल तर नवा जीव कसा येणार” पृथ्वीचा समतोल हा जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे.

ज्या माणसाला मृत्यूचे शास्त्र कळते, तोच जगण्याचा आनंद फार निस्सीमपणे घेवू शकतो. कारण मरणाइतकं सुंदर जगात काहीही नाही. सगळे गुंतागुंतीतून बाहेर पडून, द्वेश, मत्सर, वासना, हव्यास ह्या सगळ्यांच्या पलिकडे जावून त्या परमात्म्याशी एकरूप होवून त्यांच्या नामाचा गजर!

म्हणून म्हणते जन्मावर जितकं प्रेम करता, तितकंच प्रेम मृत्यूवरही करा म्हणजे आयुष्य आणखी सुंदर होईल.