मकरसंक्रांत - सण माधुर्याचा सण स्नेहगुणाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०१८

मकरसंक्रांत - सण माधुर्याचा सण स्नेहगुणाचा - मराठी लेख | Makar Sankrant Festival Madhurya Snehagun - Marathi Article - Page 3

मकरसंक्रांत हा सण भारतातील विविध प्रदेशात आणि परराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो व विविध नावाने ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यात मकरसंक्रांती किंवा संक्रांत या नावाने ओळखला जातो, तर काही भागात पोंगल असेही म्हणतात. तर पंजाब मध्ये लोहाडी, बिहार मध्ये संक्रांती, आसाम मध्ये भोगली, बिहु गुजरातराजस्थान मध्ये उत्तरायण, पतंगाचा सणपश्चिम बंगालओडिशा मध्ये मकरसंक्रांत या नावाने ओळखले जाते. तसेच भारताबाहेरील अन्य भागातही हा सण साजरा केला जातो. थारु लोक माघी थायलंडमध्ये सोंग्क्रान लाओस मध्ये मिमालाओ, म्यानमार मध्ये थिंगयान तर नेपाळ मध्ये माहे संक्रांती असे म्हणतात. हा सण भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठ्या उल्हासाने, उत्साहाने, भक्तिभावाने आणि आदरपूर्वक साजरा केला जातो.