मकरसंक्रांत - सण माधुर्याचा सण स्नेहगुणाचा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०१८

मकरसंक्रांत - सण माधुर्याचा सण स्नेहगुणाचा - मराठी लेख | Makar Sankrant Festival Madhurya Snehagun - Marathi Article

विविध धर्म, जात आणि पंथाने नटलेल्या या भारतातील एक मुख्य सण म्हणजे मकरसंक्रांत. पौष महिन्यात सूर्य ज्या तिथीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात.

विविध धर्म, जात आणि पंथाने नटलेल्या या भारतातील एक मुख्य सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत हा पौष महिन्यात येणारा महत्वाचा सण आहे. मकरसंक्रांत या सणास दक्षिण भारतात पोंगल या नावाने ओळखले जाते. पौष महिन्यात सूर्य ज्या तिथीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायणाचा प्रारंभ होतो. सूर्याच्या संक्रमणाशी आपल्या जीवनाचे संक्रमणाही जोडले आहे. या दृष्टीने हा सण सांस्कृतिकदृष्टयाही महत्वपूर्ण आहे. संक्रमण म्हणजे पुढे जाणे. पूर्वी आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते. तिथे सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस असते. ज्या दिवशी अंधाराचे साम्राज्य संपून प्रकाशाचे राज्य सुरु झाले तो दिवस आर्य लोकांनी मकरसंक्रांत म्हणून साजरा केला. फार वर्षापुर्वी लोकांना फार पीडा देणारा शंकासुर नावाचा एक राक्षस होता. त्याला मारणे आवश्यक असल्याने देवीने संक्रांतीचे रूप घेतले. शंकरासुराला संक्रांतीदेवीने ठार मारले आणि सगळ्या लोकांना सुखी ठेवले अशी मकरसंक्रांती सणाबद्दल आख्यायिका प्रसिद्ध आहे.