Download MarathiMati.com's New Android App from Google Play

गुरुपौर्णिमा एक पारंपारिक हिंदू सण

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जुलै २०१२

गुरुपौर्णिमा एक पारंपारिक हिंदू सण | Guru Paurnima Traditional Hindu Festival

गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो.

आज गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदु धर्मांतमहर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.

॥गुरु ब्रम्हा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर
गुरु साक्षात् परब्रह्म, तैस्मय: श्री गुरुवे नमः॥

या श्लोकात तर गुरुला वंदन करुन गुरुला देवतुल्य दर्जा दिला आहे. हिंदु संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून सामाजाला वाट दाखवली. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणार्‍या शिवरायांनीरामदास स्वामींना आपलं गुरु मानलं होतं. या दिवशी शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा आहे.

सामन्यत: गुरुदक्षिणेचा अर्थ बक्षिस किंवा मोबदला असा समजला जातो. परंतु गुरुदक्षिणा म्हणजे प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तसंच जनकल्याणासाठी त्याचा योग्य वापर. गुरुदक्षिणा गुरुप्रती समर्पण आणि सन्मान या भावनाचं प्रतिक आहे. साधकासाठी हा दिवस महत्वाचा असतो. या दिवशी कृष्ण मंदिर, दत्तमंदिर तसंच साई मंदिरात हा उत्सव मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. नारायणपुरच्या दत्तमंदिर आणि शिर्डीच्या साई मंदिरात भाविक मोठया प्रमाणावर गर्दी करतात, अनेक साधक मठांमध्ये आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमतात. शास्त्रीय संगीत तसंच नृत्य क्षेत्रातले कलाकार या दिवशी कार्यक्रम आयोजित करुन गुरुप्रती आदर व्यक्त करतात. प्राचीन काळापासुन गुरुशिष्यांची परंपरा चालत आली आहे. अर्जुन-द्रोणाचार्य, एकलव्य-द्रोणाचार्य, आगरकर, गांधी, सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर अशी अनेक उदाहरणं देता येतील. बुद्धधर्मींयामध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ इथे पहिल्यांदा प्रवचन दिल्याचे मानलं जातं. भगवान बुद्धांच्या स्मॄती प्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

गुरु शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर योग्य दिशा दाखवून आपल्या शिष्याला घडवतो. पण हल्ली अनेक जण योग्य गुरु न मिळाल्याने बुवाबाजी, भोंदु यांच्या आहारी जातात .

Download MarathiMati.com's New Android App from Google Play