दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ ऑक्टोबर २०१६

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे - मराठी लेख | Diwali San Manuskichya Rangane Ujalude - Marathi Article - Page 2

जगण्याचे संदर्भ बदलत चालले आहेत. मोठ्या प्रमाणावर चंगळवाद वाढलेला आहे. नैतिक मूल्यांचा र्‍हास होताना दिसत आहे. या सगळ्या अधःपतनाने आपल्याला दीप होऊन तेवत राहायचे आहे

आजच्या काळात सहवास आणि संवाद हरवत चालला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी देखील वेळ नाही. नात्यांची वीण मजबूत होण्याऐवजी ती दुभंगत चालली आहे. ऐहिक सुख आणि समाधानासाठी माणूस फक्त धावत आणि चाचपडत आहे. यंत्र तयार करणारा माणूस स्वतः यंत्र होऊन बसलेला आहे.

जगण्याचे संदर्भ बदलत चालले आहेत. मोठ्या प्रमाणावर चंगळवाद वाढलेला आहे. नैतिक मूल्यांचा र्‍हास होताना दिसत आहे. या सगळ्या अधःपतनाने आपल्याला दीप होऊन तेवत राहायचे आहे. आजही सामाजिक भान आणि जाण असलेला समाज आणि तरुण मने आहेत. हे ही आम्हाला विसरून चालणार नाही. आपल्या देशाच्या विविध भागामध्ये सामाजिक संस्था, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, सामाजिक ऋण या जाणिवेतून काम करताना दिसत आहेत. ही गोष्ट खूपच स्वागतार्य आहे.

आज आपल्या देशाच्या विविध भागामध्ये वृद्धाश्रम, अनाथ, निराधार आश्रम, महिला बालगृहे, निरिक्षण गृहे, शिशुगृहे, बालकल्याण आश्रम, डेस्टीट्युट चिल्ड्रेन होम, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, अंध - अपंग कल्याणकारी संस्था, महिला कल्याण आश्रम, निराधार महिला प्रसुतिगृहे आहेत या सर्व संस्थांना सेवाभावी वृत्तीने मदतीसाठी हात पुढे आले पाहिजेत आणि दिवाळीचा आनंद स्वतःबरोबर आपल्या बांधवांचा आनंदही द्विगुणीत केला पाहिजे.

पर्यावरणाचा विचार करुन कोणताही सण साजरा करणे गरजेचे आहे. याचे कारण हेच आहे कि, आपण सर्वजण निसर्गावर अवलंबून आहोत. निसर्ग जर संतुलित ठेवला तरच आपले आरोग्य संतुलित राहणार आहे, याचे भान आपल्या सर्वांना असले पाहिजे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे यंत्रासारखे माणसाला काम करावे लागत आहे, याचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित आणि निरोगी राखण्यासाठी सण सभारंभाच्या, उत्सवाच्या उत्साहामध्ये रंगाचा बेरंग होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.