भय इथले संपत नाही

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ डिसेंबर २०१४

भय इथले संपत नाही । Bhay Ithale Sampat Nahi

फक्त लढ म्हणा.... हि भूमिका अंगीकारून जर मैदानात उतरलात तर विजयाचे शिल्पकार व्हाल आणि भावी येणाऱ्या पिढीकरिता आदर्श व्यक्तिमत्व कारण सत्य हे नेहमी सत्य असतं व त्याला भयाची सावली केव्हाच नसते.

मनुष्याचा प्रवासाला आधीपासुनच भय नावाची दृढ संकल्पना जुळत आलेली आहे. भय हा एकांगी शब्दच माणसाच्या आत्मविश्वासाचा फज्जा करितो व आपली कशीबशी का होईना थोडीफार अशी रूजलेली पकड हळूहळू आवळून, माणसाच्या मनामध्ये कायमचे असे अस्तित्व(घर) निर्माण करतो.

विविध प्रकारच्या असंख्य अश्या भयामुळे माणसाने केलेली अमूल्य व अप्रतिम प्रगतीचा पाया हळुवारपणे पोखरून ठिसूळ बनविला आहे. माहिती असल्यानंतर सुद्धा आधी असलेल्या सवयीच्या बांधिलकीमुळे स्वतःहूनच त्याकडे ओढत जाऊन स्वत:चीच फसगत करून घेतो. हे आधीपासूनच माणसाला छान अवगत आलेल आहे.

हे नाही तर ते वा ते नाही तर हे....असलं काही पिढीजात चालून आलेले व आम्हाला मिळालेलं काही अनुवांशिक असे गुणधर्म त्यामुळे भविष्याकडे असलेल्या एकाग्रतेचा नाश होतो व जे मिळायच असत त्याला सुद्धा जवळून मुकाव लागतं. आणि नंतर आपणच केलेल्या क्रियेवर सतत पुटपुटत बसतो. काहींना तर यामधुन स्वत:ला सावरता आलेलच नाही त्यामुळे बऱ्याच वाममार्गाला लागून असलेले सुद्धा गमावून बसण्याची वेळ त्यावर स्वत:हुन ओढवून घेतो आणि त्यातून सुद्धा काही जण गमावलेला आत्मविश्वास कसाबसा पुन्हा मिळवितात परंतु तारेवरची कसरत करून कसाबसा मिळविलेल्या आत्मविश्वासाची पकड घट्ट करू शकत नाही. त्यामुळे सातत्याने फाजील पानाला सामोरे जावे लागते आणि यामधुन जो वर्ग शिल्लक राहिलेला आहे तो मात्र हळूच काढता पाय घेतो व स्वतःचीच सावरासावर करतो आणि ताट मानेने उभा राहुन देखील अपेक्षित अशी उत्तर देता न आल्यामुळे नाचक्कीलाच सामोरे जावे लागते याचा स्वतंत्र असा अनुभव स्वतःच विकत घेतो.

माणसाला जन्मानंतर कुठल्या न कुठल्या टीकाकार वृत्तीला वा अडचणींना तोंड द्यावे लागते वा सामोरे जाव लागते व जो मनुष्य पूर्ण आयुष्यभर अडचणींना समोर गेलेलाच नाही व पळपुटेपणा सोबत ठेऊन जगत राहिला, त्याचे जीवन व्यर्थ आहे असा संदेश थोर महात्मांनी आधीच दिलेला आहे.

कामाची स्वतंत्रता माणसाला अवगत झालेली असून देखील समाधानकारक प्रगती माणसामध्ये पहावयास मिळालेली नाही. याची उत्तरे दैनंदिन जीवनातल्या कर्मचारी वर्गाकडून नेहमीच मिळालेली आहे. “काम एके काम आणि काम दुनी एकच काम” ,हि कमालीची व्याख्या कर्मचाऱ्यांमध्ये रजू झालेली आहे व याचंप्रमाण सरकारी नोकरदार वर्गांमध्ये अलीकडल्या काही काळात यामध्ये लक्षणीय वाढ झाली हे दिसून आलेली आहे. कारण, विभाग तसे भरपूर आहेतच परंतु अलीकडल्या काळात काही विभागांची नावे अपेक्षेपेक्ष्या जास्त वरती आलेली असून सरकार व जनते कडून कर्मचाऱ्यांना “तोंड दाबून बुक्यांचा मार” सहन करावा लागतो आहे. त्यामुळे कामामध्ये असलेली जिद्द, चिकाटी, विश्वास, एकता, आणि शुद्धता हि मिळवून सुद्धा उचित उत्पादकता आजवर मिळालेली नाही याचीच खंतच आहे.

त्यामुळे असेल तेच काम करायचे, मिळतं त्यामध्येच जगायचं, नवीन काही न करण्याची धाडस कधी न दाखविल्यामुळे त्यामध्ये उतरणे योग्य नव्हेच ही भूमिका स्वतः अंगीकारावी आणि तारेवरची कसरत करीत असच जीवन जगत राहावं आणि अश्यांनाच पसंती दर्शवित राहावं हेच असल्या लोकांची उदारीपणाची धोरण. बरं, अश्याने कसं चालेल? याचा शून्य विचार कुणी आजवर केलेलाच नाही आणि का म्हणून करावा? याचं तिळमात्र उत्तर मिळेल याच सुद्धा धाडस कुणी आजवर दाखवीलं नाही. खर तर गोंधळ तेव्हा उडेल जेव्हा येणारी पिढी आम्हाला शब्दशः प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मागेल नि आम्ही नुसतं खिन्न अश्या नजरेने निरुत्तरीत असू व ते सुद्धा खजील होऊन. इथल्या कित्येक अश्या लोकांना आपली सत्य बाजू मांडण्याचा अधिकार मिळालेला आहे परंतु त्याला गवसणी घालताच आलेली नाही कारण आधीच मनामध्ये सर्व प्रकारचे घरं करून बसल्यामुळे त्याला सामोर जाता येत नाही. वरिष्टांची मनामध्ये असलेली भीती, विभागाच्या नाचक्कीला जबाबदार, बरोबर असलेल्यांच्या कानपिचक्या असलेल्या सर्व बाबतीमुळे आशेची टांगती तालावर फक्त आजवर घुळ खातच टांगत आलेली आहे पण तिचा उपयोग कसा व कुठे करावा याची सुद्धा परवानगी आम्हाला आजवर मिळालेली नाही व शेवटी हाती मिळेल तर काय स्वतःनेच केलेल्या वेळेचा दुरुपयोगाचं दुःख, वाया गेलेला पैसा, लोकांची वेळोवेळी हाणामारी व बेताल अश्या बोलणाऱ्या टीका..... त्यामुळे होत असं कि कुणी जर आशेनी उभी असणार्‍या व्यक्तीला सुद्धा स्वतःनेच हतबल होऊन आपल्याच जागी खाली मान घालून बसाव लागतं. परंतु फक्त लढ म्हणा.... हि भूमिका अंगीकारून जर मैदानात उतरलात तर विजयाचे शिल्पकार व्हाल आणि भावी येणाऱ्या पिढीकरिता आदर्श व्यक्तिमत्व कारण सत्य हे नेहमी सत्य असतं व त्याला भयाची सावली केव्हाच नसते. परंतु इथे आजवर असं होत आलेलं आहे की पोकळ व ठणठण गोपाळ अश्या भयामुळे मनामध्ये घर करीत आलेल्या कित्येक अश्या गोष्टींना प्रारंभ होण्याअगोदरच पडदा पाडून द्यावा लागतो.

म्हणतात ना इथे प्रत्येक बाबीला नाण्याप्रमाणे दोन बाजू असतात आणि तश्याच प्रकारे भयाने सुद्धा माणसाला तश्याच प्रकारे ग्रासले आहे. परंतु माणसाला उमजत का नाही कि मी जी गोष्ट कराव्यास जात आहे त्याला सुद्धा दोनच बाजू असेल. कारण इथे होतं असं कि कुठली पण बाजू मांडताना मनामध्ये नकारार्थी बाजूचं चित्र आधीच आलेले असते त्यामुळे सकारात्मक मिळणारच नाही याची लांब लांब पर्यंत स्वतःलाच तिळमात्र शाश्वतीच नसते म्हणूनच माणसाची फसगत होते. आणि जर अश्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर विसर पडायला लागला तर रीतसर अशी बाजू पडताळून बघायला वेळच मिळणारच नाही.

जसा आज शिक्षणाचा बट्टाबोळ झालेला आहे, आज असंख्य अश्या शैक्षणिक संस्था स्वतःच्या फायद्यासाठी बाजारात उतरल्यात, नि आपापला पाया आजूबाजूला चिखालासारखा रुजविला आहे कि ज्यामधुन कमळ तर उमललेच परंतु त्याला बाजारामधे तिळमात्र सुद्धा किंमत नसेल. आम्हाला तसली पिढी नको कि ज्याला आपल्या अस्तित्वाची जाण नाही. आम्हाला तसली पिढी घडवायची नकोय कि ज्याला आपलेच भविष्य घडविण्याची योजना माहिती नसेल. आम्हाला अशी पिढी घडवायची कि जी आपल्या निधड्या छातीने कुठलेही बाण सोसायला व कुठल्याक्षणी तयार राहील व त्याला योग्य त्या संयमानेच उलट वार करेल, त्या करिता आज असल्या शिक्षणक्षेत्रामध्ये जी काही नितांत बदलाची योग्य ती गरज आहे व त्याची नीट पारखूनच अंमलबजावणी आम्हाला करावी लागेल. अंगीकारुन व सज्ज होऊनच आम्हाला सामोरे जाव लागेल. त्या मध्ये व्यक्तिगत नुकसानाला सामोरे जाण्याची सुद्धा तयारी दर्शवावी लागेल व नितळ मानसिकता असणे सुद्धा तितकेच आवश्यक. परंतु काही जणांना असल्या प्रकारापासुन लांब राहिलेलच बरं अशीसुद्धा धारणा असतेच ...परंतु त्याला मनामधुन कायमचच काढावं लागेल. तेव्हा कुठे पसरलेल्या विस्तृत अश्या अमर वेलीला आळा घालता येईल व मनमोकळ्या पानांनी खुल्या आकाशाखाली आम्हाला श्वास घेता येईल.

मनुष्याला भय देखील असावे लागते, भयामुळे होणारे जसे बरेचसे तोटे आहे तसे फायदे देखील. फक्त अंगीकारण्याचा विश्वास हवा, करून दाखविण्याची जिद्द हवी व पेटून उठण्याची समाजरूपी जागरुकतेची योग्य ती दिशा...! भयामुळे मनुष्याला आपला मार्ग कळतो, काय खरे काय खोटे याची प्रामाणिक अशी कायापालट करता येते. काळत-नकळत काही चुकून घडू नये याची सत्य प्रत आधीच सोबत असल्यामुळे त्याला निर्णय घेण्याची भूमिका अवगत होते व अश्याच काही विशिष्ट प्रकारचे भय मनुष्याला त्याच्या खडतर आयुष्यामध्ये सुखी व समाधानी राहण्याचा कानमंत्र सतत देत राहतो व जीवनाचा समतोल सातत्याने राखण्यास वेळोवेळी मदद करीत राहतो.