बंधनातली ती

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २०१८

बंधनातली ती - मराठी लेख | Bandhanatali Tee - Marathi Article

आज आपण बोलतो स्त्री - पुरुष समानता, मग ही अशी समानतेची वागणूक तिच्यासाठीच का?

तिच्या हसण्यावर, तिच्या बोलण्यावर, तिच्या उठण्यावर, तिच्या बसण्यावर, तिच्या चालण्यावर, तिच्या खाण्यावर, तिच्या पेहराव्यावर इत्यादी या सगळ्या मर्यादा, बंधन तिच्यासाठीच का? आज आपण बोलतो स्त्री - पुरुष समानता, मग ही अशी समानतेची वागणूक तिच्यासाठीच का? त्याच्यासाठी का नाही? मग आज ‘ही’ हे बोलण्या इतकेच आहे.

तिच्या वयानुसार तिच्या कपड्यांची परिभाषा बदलते. पण का आपण एखाद्याच्या कपड्याहून त्या व्यक्ती बद्दलच मत देतो ते देखील चुकीचंच. मला सांगा तिने जर पंजाबी सूट किंवा साडी घातली तर ती सुसंस्कारी आणि तेच जर तिने जीन्स आणि टॉप किंवा वन - पीस घातला तर तिला संस्कार नाहीत म्हणून आपण मत देऊन बसतो. पण कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? तिच्या आयुष्यात तिने काय करावं, काय नाही हा सर्वस्वी तिचा आणि तिचाच प्रश्न आहे.