लेकीचा बाबा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८
लेकीचा बाबा - अनुभव कथन | Lekicha Baba - Anubhav Kathan
लेकीचा बाबा

साचीला रात्री अंथरूणात सु... सु... करायची सवय. काल रात्री अचानक उठली. बाथरूमची लाईट लावली आणि बाथरूम मध्ये गेली. मी अर्धवट झोपेत उठुन बसलो आणि तिची चादर आणि अंथरूण बदललं. अजून साची बाथरूममधुन बाहेर नाही आली म्हणुन मी उठुन बघितलं तर ही पॉट वर बसून बेसिनला डोके टेकुन होती.
“काय झालं? सु सु झाली ना?” मी विचारलं.
केवळ हात वर करून नाजुक दोन बोट वर केली. डोकं तसंच बेसीनला टेकलेलं.
“अगं, दिवसभरात शी शी करायची ना. मग अशी रात्री झोपमोड होत नाही.” मी नेहमी प्रमाणे बोललो.असं या पुर्वी १ - २ वेळा झालं होतं. माझे पुढील बोल टाळण्यासाठी असेल कदाचित ती बोलली,
“तुम्ही झोपा. मी तुम्हाला झालं की सांगेन.”
मला एक क्षण काही कळलं नाही. मी मोबाईल मध्ये वेळ बघितली. रात्रीचे दीड वाजले होते. त्या वेळी मला आठवलं ते ‘तिचा बाबा’. शाळेतुन कुणाच्या वाढदिवसाला एक चिक्की मिळाली तरी बाबासाठी त्यातुन थोडी राखुन ठेवणारी, चॉकलेट किंवा तिला आवडत काही असेल तर बाबांचा हिस्सा मागुन तो ठेवणारी आणि बाबा कामावरून घरी येताच आठवणीने त्यांचा हिस्सा त्यांना ऑफर करणारी साची, कारण तीला ठाऊक आहे ते तीलाच मिळणार. एवढ्यात बाबा, झाली शी शी. तिला धुऊन परत झोपेचा प्रयत्न करताना आठवत होत ते केवळ लेकीचं बाबा वरच प्रेमच. म्हणुन सकाळीच आठवून लिहिण्याचा केलेला हा प्रयत्न.

  • TAG