Aksharmanch

प्रश्न?

हर्षद खंदारे

सर्वांच्या नजरा एकवटलेल्या भुकेल्या नरभक्षकासारखा

माझ्यावर !

आणि मी अस्तीत्व पणावर लावलेल्या....

निर्भीड पण बावरलेल्या - निरागस

हरणासारखा-रानोमाळ....

अखेरचा क्षणापर्यन्त

श्वासांच्या शर्यतीत जिंकण्याच्या विलक्षन ध्यासाने पेटलेलो,

मात्र..

मनाच्या खांद्यावर श्वापदांच्या सुळ्यांचे ओघळणारे रक्तरंजीत पसायदान..

नरडीचा घोट घेऊन देखील मुठीत आवळून धरलेली क्षितीज रेघ...

आणि काहिशी संभ्रमात पडलेली..

माझी अंधुक पण स्वच्छ नजर

विचारत होती

हे सर्व का?

आणि कशासाठी?

हे सर्व का?

आणि कशासाठी?

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.