Aksharmanch

सोबत

हर्षद खंदारे

वाट चुकलेल्या वाऱ्या सारखा....

मी बावरलेलो...

झाडा-झाडातून पाना-पानातून

आभाळ पिंजत ...

अन्‌, तुझ वावरणं....

अगदिच ताऱ्यांसारख...

सोबतीला असुन

संगतीला नसलेलं!

वाट चुकलेल्या वाऱ्या सारखा....

मी बावरलेलो...

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.