Aksharmanch

अंतःरीतून

हर्षद खंदारे

घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी

आनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी

का कळेना सांग तुजला गुज माझ्या अंतरीचे

घे जरासा सोबतीला, प्राण ही गातोय गाणी

येवू दे काठावरी तू स्वप्न जे ओठांवरीचे

बिलगुनी लाटांस माझ्या काठ ही गातोय गाणी

लेवुनी जखमा सुगंधी स्वप्न सजले अंतःरीचे

श्वासन्या तुजला पुन्हा तो भास ही गातोय गाणी

तेच - ते सांगु कीती मी

जीर्ण या ओळींतूनी

या...

काळजातून वाहणार चेहरा गातोय गाणी

घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी

आनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.