NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३

Dnyankranti Karandak Pune 2013

विराज काटदरे (मराठीमाती.कॉम)

ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३

पुण्यातील कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ ते १५ फेब्रुवारी या तीन दिवसात, ज्ञानक्रांती (पाषाण), या शैक्षणिक व सामाजिक संस्थेने खुल्या एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या. काल या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

ज्ञानक्रांती करंडक, या स्पर्धेमध्ये एकूण २३ संघांनी भाग घेतला होता. हे सर्व संघ मुंबई, पुणे, नगर, पिंपरी, ठाणे इ. येथून आले होते. या २३ संघांची नावे व त्यांच्या एकांकिका खाली नमूद केले आहे.

 • स्वरगंध संस्था, पि. चि. - रिव्होल्यूशन
 • प्रभद्र एन्टरटेनमेंट - चौकोनी त्रिकोण
 • मॉडर्न गणेशखिंड महाविद्यालय - इन वन आवर
 • अंकुर प्रतिष्ठान - स्त्रीभ्रूण हत्या
 • मातोश्री वृद्धाश्रम - सेकंड इनिंग्स
 • सप्तक, पुणे - मुक्ती
 • पी. डी. ए - निर्मलग्राम
 • मॉडर्न शिवाजी नगर - सर्चिंग इन
 • गरवारे वाणिज्य - क म्हणजे करमणूक
 • कल्पक नाट्य - स्लॅब बॉक्स
 • स्टेज ड्रिम्स प्रोडक्शन - आरजी
 • ब्लॅक बॉक्स - वन बॉल टू गो
 • शाश्वत, पुणे - बोलट
 • प्रयोगशाळा निर्मिती - नाहीतर फुकट
 • आकृती कलामंच - जस्त फॉर यू
 • पेज टू स्टेज - धर्मसंग्राम
 • इंद्रायणी कलामंच, वडगाव मावळ - वेताळाची गोष्ट
 • भरत नाट्य मंदीर - यज्ञाहुती
 • वेद युवा प्रतिष्ठान, आकोला - सत्यम शिवम सुंदरम
 • रंग, पुणे - भवरा
 • कला विश्व, मुंबई - आवाज
 • समर्थ - ओळख
 • अनुभूती, मुंबई - फॅमिली बिझनेस

या २३ संघांच्या एकांकिकांचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पानसे, डॉ. समीर मोने व विनीता पिंपळखरे यांनी केले व ज्ञानक्रांती करंडकाचे प्रथम पारितोषिक त्यांनी रंग पुणे या संस्थेची एकांकिका ‘भवरा’ याला प्रदान केले. द्वितीय क्रमांक पटकावला प्रयोगशाळा या संघाच्या ‘नाहीतर फुकट’ या एकांकिकेने तर, भरत नाट्य मंदिर संघाच्या ‘यज्ञाहुती’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक मिळवला. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संदिप पाठक तेथे उपस्थित होते व त्यांच्या हस्ते विजेत्या संघास ज्ञानक्रांती करंडक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेते संदिप पाठक म्हणाले की, ‘कला हे असे माध्यम आहे ज्यातून सामाजिक जाणीवा अधिक दृढ होत जातात. दुष्काळ, राजकीय परिस्थिती, महिलांच्या व अशा अनेक समस्यांमुळे आज हा समाज त्रस्त झालेला आहे. या वेगवेगळ्या समस्यांवर आधारित केलेल्या एकांकिका समाजात माणसाला माणसाशी जोडण्यात अधिक भक्कम ठरतात. ज्ञानक्रांती, हे एक असे व्यासपीठ आहे की जे थेट समाजाच्या संवेदना जागृत करते’.

ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश विचारले असता ज्ञानक्रांतीचे संस्थापक-अध्यक्ष केदार कदम व आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुचेत गवई यांनी माहिती दिली की, ही संस्था नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी व व्यासपीठ उपलब्ध करुन देते. ज्ञानक्रांती करंडक ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे की ज्यामध्ये तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण भाग घेऊ शकतात व हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे की जी सर्वोत्कृष्ट अभिनय करणाऱ्या (पुरुष व स्त्री) यांना वर्षभर दर महा ५०० रुपये मानधन देते. मागील सहा वर्षांपासून ही संस्था कार्यरत आहे. ज्ञानक्रांती केवळ विजेत्या संघालाच नव्हे तर, प्रत्येक संघातील कलाकाराला प्रथम, द्वितीय व तृतीय या श्रेणीतील बक्षीसे प्रदान करीत असते की जेणेकरुन मुले, पारितोषिक न मिळाल्यामुळे नाराज होऊ नये व आपली नाट्य कला बंद करु नये. थोडक्यात, ही संस्था सर्वांना प्रोत्साहन करणारे बक्षीस देत असते.’

या वर्षीचे सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत, विश्वास पांगरकर ज्यांनी ‘यज्ञाहुती’ (भरत नाट्य मंदिर संघ) या एकांकिकेमध्ये शिखंडीची भूमिका केली होती आणि नेहा मांडे ज्यांनी ‘निर्मलग्राम’ (पी. डी. ए, पुणे) मध्ये कुलकर्णी बाईंची भूमिका केली होती.

या स्पर्धेतील अन्य विजेत्यांची नावे आहेत..

 • अभिनय प्रथम पुरुष - विश्वास पांगरकर (यज्ञाहुती)
 • द्वितीय - शिवराज वायचळ (नाहीतर फुकट)
 • तृतीय - आशिष नसलापुरे (भवरा)
 • अभिनय स्त्री - नेहा मांडे (निर्मलग्राम)
 • द्वितीय - गंधाली घाटे (सर्चिंग इन अवनी)
 • तृतीय - रमा नाडगौडा (जगदंबा)
 • दिग्दर्शन प्रथम - अभिषेक देव, विक्रांत बदरखे (भवरा)
 • द्वितीय - नकुल सुतार (नाहीतर फुकट)
 • नेपथ्य प्रथम - अभिलाष मत्रे (सर्चिंग इन)
 • द्वितीय - अंकुर असेरकर (नाहीतर फुकट)
 • संगीत प्रथम - राहुल जोगळेकर, गिरीश दोशी (आरजी)
 • द्वितीय - प्रिया नेर्लेकर (यज्ञाहुती)
 • प्रकाश योजना प्रथम - पुष्कर केळकर (यज्ञाहुती)
 • द्वितीय - गौरव पोळ (भवरा)

या कार्यक्रमात योगीराज पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तपकीर, ज्ञानक्रांती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष केदार कदम, डॉ. दिलीप मुरकुटे, नगरसेवक प्रमोद निम्हण, शिवलाल धनकुडे, सत्यजित धांडे, संजय निम्हण, तुलसीदास महाजन, संतोष चव्हाण, बाळासाहेब भांडे व वसंत माळी हे मान्यवर उपस्थित होते.

नाहीतर फुकट या एकांकिकेतील कलाकार रोहित मोकाशी आणि शिवराज वायचळ यांचे एक दृष्य.
ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३
नाहीतर फुकट या एकांकिकेतील कलाकार रोहित मोकाशी आणि शिवराज वायचळ यांची एक हस्यास्पद मुद्रा.
ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३
नाहीतर फुकट या एकांकिकेतील कलाकार रोहित मोकाशी आणि शिवराज वायचळ यांची एक हस्यास्पद मुद्रा.
ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३
नाहीतर फुकट या एकांकिकेतील कलाकार शिवराज वायचळ आणि रोहित मोकाशी यांचे एक दृष्य.
ज्ञानक्रांती करंडक पुणे २०१३

Book Home in Konkan