marathi calendar marathi dinadarshika

चला मित्रांना बोलावुया महाराष्ट्राच्या विलोभनीय सफरीवर..

Travel Maharashtra State - Join MarathiMati.com

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   

Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articles Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language
Samwad - World of Words Maharashtra, Marathi Related News & Events in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language
MarathiMati - Home

मराठीमाती डॉट कॉम / महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष

BACK | MAHARASHTRA HOME

Maharashtra State Information about Travel, Literature, Culture, Art, Sports

Print this page Print this Information | Send to your friends Send to Friends

 

धर्म पंथतीर्थक्षेत्रेविधी आणि संस्कारचालीरीती परंपराप्राक्कालीन वाङ्‍मयीन अभिव्यक्तीआजकालचे वाङ्‍मयनाटकचित्रपटसंगीत

धर्म आणि पंथ - मीना तालीम

महाराष्ट्रात उदयास आलेल्या किंवा ज्यांनी आपल्या वैशिष्ट्यांमुळे आजचा महाराष्ट्र व मराठी संस्कृती निर्माण करण्यास मदत केली. अशाच धर्मसंप्रदयांचा प्रस्तुत लेखात थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात मुख्यतः पाच संप्रदाय आहेत. वास्तविक पहाता हे संप्रदाय वैष्णव अथवा शैव पंथांच्या शाखा आहेत. हे संप्रदाय आपापल्या विशिष्टपणामुळे प्रसिद्धिस आले. इतर राज्यात आढळणारा वैष्णव व शैव या दोन पंथांतील दुरावा महाराष्ट्रात दिसून येत नाही.

वैष्णव संप्रदाय
महानुभाव
ह्या प्रमुख संप्रदायांपैकी महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. त्यांना "पंचकृष्णा" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत.
या पंथांवर जैन व बौद्ध धर्मांचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यानी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सुत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत.
सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात.
वारकरी संप्रदाय
वारकरी पंथाचे लोक विष्णूची विठ्ठल या रूपाने आराधना करतात. तेही भक्तिमार्गी आहेत. कर्नाटकच्या होयसाल राज्यकर्त्यांनी या पंथाची प्रथम महाराष्ट्राला ओळख करूने दिली. ज्ञानेश्वर व नामदेव या दोघा संतांनी त्याचा पाया महाराष्ट्रात भक्कम केला. म्हणूनच म्हटले आहे- ज्ञानदेवे रचिला पाया. वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रमुख पंथ आहे. आजही हजारो वारकरी मोठ्या पालख्या घेऊन आषाढी-कार्तिकी एकादशांना दिंड्या काढून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी पायी जाताना आढळतात.
विठ्ठल हे दैवत नामदेव वा ज्ञानदेवाच्या जन्माच्या आधीपासून महाराष्ट्रात ठाऊक होते. पंढरपूरच्या देवालयातील शिलालेख त्याची स्थापना सहाव्या शतकात झाली असे दाखवितो. परंतु नामदेव व ज्ञानेश्वरांनी या पंथात एक चैतन्य निर्माण करून या पंथाचा महाराष्ट्रात सर्वत्र प्रसार केला. ज्ञानयोग, भक्तियोग व अद्वैताचा अवलंब करून त्यांनी या भक्तिमार्गाला एक नवा दृष्टिकोन दिला.
वारकरी पंथ जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाही. यज्ञायाग, चातुर्वर्ण्य, दलित वर्ग व स्त्रिया यांचे शोषण याविरूद्ध या पंथाच्या अनुयायी बंडखोरी पुकारली. दलित वर्गीय व स्त्रिया यांना विठ्ठलावर अभंग रचून ते गाण्याचे अधिकार प्राप्त झाले. सर्वांनी मिळून समूहाने अभंग, प्रार्थना, भजन करण्याचा प्रघात पडला. त्याचप्रमाणे कीर्तन हा प्रकार लोकप्रिय झाला. या समूह गायनामध्ये गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरूष, बुद्धिवान वा निरक्षर असा भेद कधीच केला गेला नाही. या सर्व नव्या रूढीमुळे महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमुळे उजळून निघाला. देवभक्ती व मानवता या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्रावर फार मोठा परिणाम झाला आणि पर्यायाने महाराष्ट्रीय जनतेची एकजूटही वाढली.
या पंथाचा ध्वज वारकरी पंथातील सर्व जातीजमातीतील अनुयायांनी फडकत ठेवला. चोखामेळा (महार), सावता माळी (माळी), तुकाराम (वैश्य) व एकनाथ (ब्राह्मण) अशा सर्व थरातील शिश्यांनी या पंथाला समाजात विशेष स्थान प्राप्त करून दिले. या पंथात गुरू नाही की मठ नाही. वारकरी हा स्वतःच्या हिंमतीने स्वतःला वैकुंठाप्रत नेण्याची आकांक्षा बाळगतो. ते करताना त्याचे भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग या कोणत्याही मार्गाचा अवलंब करावा. असे करीत असता तो जे थोडबहुत नियम पाळतो ते असे- शाकाहार करणे, मद्यपान अथवा स्वैराचार वर्ज्य, एकादशीला उपवास करणे, चंदनाचा टिळा कपाळावर लावणे, गळ्यात तुळशीची माळ घालणे व पंढरपूरची वारी करणे. या अत्यंत साध्या नियमांमुळे अतिशय दरिद्री अथवा निरक्षर माणूससुद्धा या पंथाच्या चौकटीत स्वतःचे स्थान मिळवू शकतो. या संप्रदायामुळे मराठी भाषेला काव्याप्रमाणेच तत्वज्ञानाचे लेणे लाभले.
समर्थ संप्रदाय
समर्थ रामदास यांचा जन्म ब्राह्मण कुळात, मराठवाडा विभागातील जांब येथे १६०८ साली झाला. रामदास हे रामाचे उपासक होते. परंतु त्यांनी हनुमान उपासनेवर विशेष भर दिला. हा संप्रदाय वर्णाश्रम धर्म, वैदिक तत्त्वज्ञान व मोक्ष मानतो. रामदासांचा विशेष म्हणजे ते स्वतः सामाजिक व राजकीय समस्यांबद्दल अत्यंत जागरूक होते. त्याचप्रमाणे त्यामुळे त्या काळी जनतेवर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांना चीड होती. या सर्वांचा परिणाम त्यांच्या शिकवणुकीवर झाला.
त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मठ स्थापना केली व देवालये बांधली. बलोपासना व एकजूट होण्यासाठी त्यांनी मारूती उपासनेच्या प्रचार केला. व्यायामशाळा, कुस्त्यांचे फड, मर्दानी खेळ यांना प्रोत्साहन दिले. याशिवाय त्यांनी संन्यासधर्म तरुण मंडळीत प्रचलित केला. त्यांनी संन्यासी स्वयंसेवकांची पथके निर्माण केली. हे तरुण संन्यासी मठात रहात. सामाजिक व राजकीय अन्यायांबद्दल जागरूक असत. अन्याय, जुलूम, जबरदस्ती आढळेल तेथे धाव घेऊन लोकांना न्याय मिळवून देत. रामदास हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी होते. त्यांनी महाराजांना उपदेशात्मक लिहिलेले आहे. समर्थांचे मठ हे कित्येक मराठी सैनिकांची आश्रयस्थाने असत.
रामदास तत्वज्ञानी व विद्वावान होते. त्यांने निर्गुण व निराकार अशा विष्णूची (रामाच्या) भक्तिमार्गाची शिकवण दिली. या पंथात पादुका-पूजेला एक आगळे स्थान आहे. हे आणि त्यांचे शिष्य यांनी मराठी वाङ्‍मयात विशेष भर घातली आहे. रामदासांचा दासबोध व मनाचे श्लोक महाराष्ट्रात आजही मोठा प्रमाणावर वाचले जातात. भागवत धर्मामध्ये समर्थ संप्रदायाला एक विशेष स्थान आहे. त्यांनी लोकजागृती, लोकांची एकजूट व राजकारणाबद्दल आस्था यावर विशेष भर दिला. त्याचप्रमाणे मनाच्या सौंदर्याप्रमाणे तितकेच आवश्यक आहे अशी शिकवणूक दिली.
दत्त संप्रदाय
या पंथांत विष्णू आणि शिवभक्तीचा मिलाफ दिसून येतो. दत्तात्रेय हा ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रयींचा संगम होय. पुराणे व उपनिषदे या दैवताच्या उत्पतीची, तसेच त्याच्या कार्याची, शिष्यांची व तत्वज्ञानाची माहिती पुरवितात. या सर्व लेखी पुराव्यावरून हे दैवत मुळात कारण शाक्तपंथीय असावे असे वाटते. पाच "म"कारांच्या उपभोगाचीही माहिती यात आढळते. बाराव्या शतकात दत्तात्रेयाची मूर्ती एकमुखी आढळते. मात्र पंधराव्या शतकापासून ते त्रिमुखी झालेली दिसते.
महाराष्ट्रात या दैवताचा उल्लेख महानुभाव, वारकरी व नाथ पंथातही आढळतो. श्री नृसिंहसरस्वती (इ.स.१३००) यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांनी दत्तोपासनेला एक वेगळेच स्वरूप देऊन महाराष्ट्रात हा पंथ लोकप्रिय केला. ते स्वतः गावोगावी हिंडले व पंथाचा प्रचार केला. त्यांनी सुदैवाने अत्यंत गुणी असा शिष्यगण प्राप्त झाला. उदाहरणादाखल नावे घ्यावयाची झाल्यास जनार्दनस्वामी, दासोपंत, मुक्तेश्वर, माणिक प्रभू व श्रीधरस्वामी यांना विसरता येणार नाही.
दत्तात्रेयाचे उपासक य दैवताची पूजा `गुरू'च्या स्वरूपात करतात. म्हणूनच की काय गुरूदेव दत्त किंवा श्रीगुरू दत्त असा त्याचा उल्लेख होत असतो. हा पंथ वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार करीत असला तरी संन्यास धर्माला विशेष मानतो. गुरूभक्ती, साधना, सिद्धान्त व पादुका पूजा यावर या संप्रदायाचा विशेष भर आहे. उपासक वर्ग हा बहुधा माहूर, औदुंबर, नरसोबाची वाडी व गाणगापूर [कर्नाटक] येथे यात्रा करीत असतो. शिरडीचे साईबाबा हे काहींच्या मते दत्तात्रेयाचे अवतार आहेत. या संप्रदायाकडे हिंदू संन्यासीच नव्हे पण मुसलमान फकीरसुद्धा आकर्षित झाले होते.

शैव आणि शाक्त पंथ
नाथ संप्रदाय
नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व प्राचीन संप्रदाय आहे. महाराष्ट्रातील हरीनाथ यांची शिकवण विदर्भ व मराठवाडाभर पसरली तर बंगालचे मत्स्येन्द्रनाथ यांचे शिकवण महाराष्ट्रातील इतर भागात पसरली हरिनाथांचा भर वेदान्त सिद्धान्तावर तर. मत्स्येन्द्रनाथांचा भर योगतंत्रावर अधिक होता.
आदिनाथा हे या सांप्रदायाचे प्रवर्तक. नवनाथ व सिद्ध या नावाने ओळखली जाणारी त्यांची मोठी शिष्यपरंपरा आहे. अकराव्या आणि बाराव्या शतकात महाराष्ट्रभर या संप्रदायाचा प्रसार झाला. ज्ञानेश्वरांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांचे गुरू गहिनीनाथ हे नाथ पंथीयच होते. या दोन्ही बंधूंच्या शिकवणीचा वारकरी व महानुभव पंथांवर परिणाम झाला. नाथ संप्रदायातील बरीच तत्वे वारकरी पंथात शिरली ती केवळ निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांच्यामुळेच, म्हणून वारकरी पंथात विठ्ठल भक्तीशिवाय द्वैत, अद्वैत, योग आणि तंत्र यांची सांगड घातलेली दिसते.
नाथ पंथीय योगविद्येत विशेष प्रवीण होते. हठयोग हा तर त्यांचा आवडता छंद, असे म्हणता की हठयोगामुळे पाण्यावरून चालणे, अवकाशात फिरणे अथवा श्वसनक्रियेवर ताबा मिळवून आयुष्य वाढविणे या गोष्टी त्यांना सहजसाध्य होत्या. आत्यंतिक गुरूभक्ती हा तर त्यांचा एक विशेष. गोरक्षनाथाच्या शिष्याने आपल्या गुरूची वडा खाण्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता एका वृद्ध बाईला आपला डोळा अर्पण केला अशी आख्यायिका आहे. योगामुळे सिद्धि प्राप्त होतात. परंतु त्याचे प्रदर्शन करू नये असा एक दण्डक होता. तांत्रिक विद्येलासुद्धा या पंथात स्थान आहे. तंत्रसाधना करण्यासाठी शजयान व वज्रयान या मार्गाचा ते अवलंब करीत. महायान बौद्धधर्माची आपल्याला इथे आठवण येते. शिव आणि शक्ती या एकच आहेत, परंतु योग्य वेळी त्यांची फारकत करता येते असा त्यांचा विश्वास आहे. शिव-शक्ती-अद्वैतवाद हे नवीन तत्त्व गोरक्षनाथांनी शिकविले. या पंथात स्त्रियांना मानाने वागविले गेले. गोरक्षनाथांच्या विमलादेवी नांवाच्या तांत्रिक विद्येतील शिष्येने महाराष्ट्रात आई-नाथ असा एक उपपंथही काढला होता. नाथपंत मुख्यत्वे बीड, आळंदी, अहमदनगर व सातपुडा येथे जास्त लोकप्रिय आहे.
शैव संप्रदायात जेजूरीचा खंडोबा, नाशिकचा त्र्यंबकेश्वर व अष्टविनायक मोडतात. ही दैवतेही महाराष्ट्रात अजून प्रचलित आहेत आणि लोकप्रिय आहेत.

शाक्तपंथ
शाक्तपंथाचा महाराष्ट्रातील इतिहास हा तसा गूढच आहे. परंतु पार्वतीची उपासना निरनिराळ्या नावाने इथे प्रचलित आहे. तिची एकंदर साडेतीन पीठे महाराष्ट्रात आहेत. ती म्हणजे महालक्ष्मी, भवानी, रेणुका व सप्तश्रृंगी होत. प्रत्येक महाराष्टीय कुटुंबाला एकेक कुलदैवत व कुलदेवी असते. ज्यांची ते मनोभावे पुजा करतात.

मातृक-देवता
महालक्ष्मी अम्बा या नावाने विशेष प्रसिद्ध आहे.तिचे देऊळ कोल्हापूला असून त्यातील शिलालेखावरून ते राष्ट्रकूटांच्या कारकीर्दीत नवव्या शतकात उभे राहिले असे दिसते. या देवालयातील एका भिंतीवर श्री-यंत्र कोरलेले दिसते. त्यावरून ही देवी शाक्तपंथीय असावी असे वाटते. हे दैवत मराठ्यांच्या काळात विशेष प्रसिद्धीस आले. क्षत्रिय व वैश्य अशा सर्व जातीत या देवीचे भक्त आहेत.
भवानीचे देऊळ तुळजापूरला आहे. ही देवी मराठ्यांच्या काळात लौकिकास आली. छत्रपती शिवाजी महाराज तिच्या दर्शनास येत व तेथे त्यांना स्फूर्ती मिळत असे. भोसले घराण्याचे हे कुलदैवत आहे. रामदास स्वामी देखील हिचे उपासक होते. या देवीला पशूबळी व मद्य यांचा नैवेद्य दाखवीत. ही प्रथा आता नष्ट होत चालली आहे. परंतु ती प्रथा शाक्त पंथाची द्योतक आहे.
रेणुका ही महाराष्ट्रातील एकवीरा, यमाई व यलम्मा या नावानीही ओळखली जाते. एकवीरा देवीचे अर्थ कोरीव शिल्प कार्ले येथील लेण्यांच्या आवारात आढळते. एकवीरा हा शब्द एक विहार (बुद्धभिक्षूंचे रहाण्याचे स्थान) यावरून आला असावा. भाषा-नियम शास्त्रानुसार या तर्काला पुष्टी मिळते. गंमत अशी की हे दैवत फक्त क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या जातीतील लोकांचेच कुलदैवत आहे. ब्राह्मणांचे कुलदैवत असल्याचे ऐकिवात नाही. ही सूचकता आपल्याला प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासात तर घेऊन जात नाही ना की जेव्हा बौद्धधर्म महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असून या तिन्ही थरातील लोक त्याचे निष्ठावंत उपासक होते. दर वर्षी हजारो भक्त चैत्र पौर्णिमेला कार्ले [लोणावळे] येथे जाऊन तिचे दर्शन घेतात. तिला कोंबडी अथवा बकरे नैवेद्य म्हणून अर्पण करतात.
यमाईचे भक्तगण बहुधा सातारा, सोलापूर, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात आढळतात. तिचे देऊळ औंध येथे टेकडीवर बांधलेले आहे. काही विद्वानांच्या मते यमाई ही दुर्गादेवीचा एक अवतार आहे. यलम्मा देवी कर्नाटकात जास्त मानली जाते.
सप्तशृंगी ही देवता अर्धपीठ म्हणून समजली जाते. इतरांप्रमाणे हिचे देऊळ सप्तशृंगीच्या डोंगरावर आढळते. ते नाशिक जिल्हयात आहे. ती बऱ्याच महाराष्ट्रीय कुटुंबांची कुलदेवता आहे. नाशिक, धुळे व जळगांव या जिल्ह्यात ती अधिक लोकप्रिय आहे.
सुफी पंथ
हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी-पंथ हा इस्लाम धर्मीय पंथ असून इस्लाम धर्मातील भक्तिमार्गी पंथ आहे. हा पंथ महाराष्ट्रात नवव्या शतकात इजिप्तमधील नुरूद्दिन या संताने आणला. यादवोत्तर काळात, सुमारे १३ व्या शतकाला मुतजबोद्देन याने याचा प्रचार पैठण, विजापूर, गाणगापूर, पुणे आणि पेण या भागात केला. याच शतकात नाथ व महानुभाव पंथीय उपासकांची त्यांच्याशी देवाणधेवाण झाली. ही देवाणघेवाण तत्वांची होती. काबूलच्या बाब रतन हाजीचा संबंध गोरखनाथाशी आला व त्याने काफिर-बोध नावाचा ग्रंथ लिहिला. पुष्कळ इस्लाम धर्म पंथीयांनी नाथ पंथात प्रवेश केला तसेच महानुभावींचे मठ देखील काबूल व कंदाहार मध्ये स्थापले गेले. याशिवाय आठव्या शतकात कोकणात अनेक अरब व्यापारी आले आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्रात इस्लाम धर्माचा प्रसार होण्यास मदत झाली.

बौद्धधर्म (नवबौद्ध धर्म)
सदर लेख नवबौद्धधर्माचा उल्लेख न केल्यास अपुरा ठरेल. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह १९५६ च्या विजयादशमीच्या दिवशी बुद्धधर्मात प्रवेश केला. हा दीक्षा समारंभ नागपूर येथे झाला. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा व कोकण येथील दलित समाजाने यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला.
पुरातन वास्तू व प्राचीन लिखाण यांचा शोध घेतला असता बौद्धधर्म महाराष्ट्रात सातव्या शतकापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रचलित होता. पर्सी ब्राऊन या विद्वानाच्या मते बौद्ध शिल्पांपैकी अर्ध्याहून अधिक शिल्पे महाराष्ट्रात सापडतात ही गोष्ट बौद्ध धर्माला महाराष्ट्रात त्या काळी असलेली लोकप्रियता दर्शविते. अशा तऱ्हेची डोंगरात खोदून काढलेली वास्तु-शिल्पे कोणी वास्तुसौंदर्यासाठी निर्माण करीत बसत नाहीत किंवा वैयक्तिक आवडीपोटीही ती निर्माण होत नाहीत हे उघडच आहे.
या चळवळीमध्ये दलित वर्गातील महार समाज डॉ. आंबडेकरांच्या पाठीशी निर्धाराने उभा राहिला. आज नवबौद्धांमध्ये स्वतःबद्दल आत्मविश्वास आढळतो. कित्येकांनी आपली चांगली उन्नती केली आहे. बरेच जन सरकारी नोकर म्हणुन काम करीत आहेत. मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेत आहेत. जगातील इतर बौद्धधर्मीयापेक्षा ते अनेक दृष्टींनी वेगळे आहेत. कारण ते भारतीय आहेत. बव्हंशी बौद्ध धर्मातील हीनयान पंथाचे ते अनुयायी असून आज महाराष्ट्रात त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

  LEGAL PLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology
Channel Websites -MarathiMati™.com - MarathiMati™.net - MarathiMati.org - MarathiMati™.tv - MARATHIPATRA.com - NashikDiary.com - PUNEPRIME.com - NamdeoShimpiSamaj.org - MAHARASHTRAPRIME.com