marathi calendar marathi dinadarshika

Visit to Maharashtra State(India) Invite Your Friends

Travel Maharashtra State - Join MarathiMati.com

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   

Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free Aksharmanch :Marathi Writers,Artists,Marathi Kavita,Charoli,Articles,Paintings Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra State Art - Marathi Arts (Kala) of Maharashtra State Legends of Maharashtra State MarathiMati TV
Marathi Lekh - Marathi Articals Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature of Maharashtra State Aapali Marathi - All about Marathi Language Hiraval - Maharashtra Green
Samwad - World of Words Maharashtra State related News & Events Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Marathi Karamnuk - Entertainment about Marathi Films, Movies, Dramas, Marathi Songs, Marathi Jokes, Marathi Vinod Maharashtra State Travels - Maharashtra State Travel Information Maharashtra, Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language All Web Channels
MarathiMati - Home Maharashtra

मराठीमाती डॉट कॉम / महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष

BACK | MAHARASHTRA HOME

Maharashtra State Information about Travel, Literature, Culture, Art, Sports

Print this page Print this Information | Send to your friends Send this Page

श्रीशंकराच्या आरत्या
Shankarachya Aartya

(१)
लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

(२)
(श्रीत्र्यंबकेश्वराची आरती )
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ॥ त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥ वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥ विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥ पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥ त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥ प्रसन्न हो‍उनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥ औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥ धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो । आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥ वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥ तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥ ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥ तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥ तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥ केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥ लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥ संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥ शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥ गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥

(३)
जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥ पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥ भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥ अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥ जय देव जय देव जय शंकर सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु० ॥ जगदंकुरवरबीजा सन्मय सुखनीजा ॥ सर्व चराचर व्यापक जगजीवनराजा ॥ प्रार्थित करुणावचनें जय वृषभध्वजा ॥ हर हर सर्वहि माया नमितों पदकंजा ॥ जय देव० ॥ २ ॥ गंगाधर गौरीवर जय गणपतिजनका ॥ भक्तजनप्रिय शंभो वंद्य तूं मुनिसनकां ॥ करुणाकर सुख्सागर जगनगिंच्या कनका । तव पद वंदित मौनी भवभ्रांतीहरका ॥ जय देव जय देव जय शंकरा सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ३ ॥

(४)
कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला । नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥ श्रु० ॥ त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा । उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥ तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा । नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥ ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी । जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥



आरतीसंग्रह (Aarti Sangraha)

  • श्रीदत्तात्रेयाच्या आरत्या

  • श्रीनृसिंहाची आरती

  • श्रीपरशुरामची आरती

  • श्रीअनंताची आरती

  • दशावताराची आरती

  • श्रीमारुतीच्या आरत्या

  • श्रीगुरूच्या आरत्या

  • श्रीसत्यनारायणाची आरती

  • सूर्याची आरती

  • गरुडाची आरती

  • चंद्राची आरती

  • श्रीशनिदेवाची आरती

  • श्रीव्यंकटेशाची आरती

  • श्रीखंडेरावाची आरती

महाराष्ट्रातील संस्कृतीची माहिती

 

मराठीमातीचे सभासद व्हा! (Click here to Join MarathiMati.com)
मराठी गझल
  Ilahi Jamadar - Marathi Ghazals इलाही जमादार - भावनांची वादळे
मराठी कविता
  एक बामण ढसाळलेला : मुकुंद शिंत्रे
अक्षरमंच
 

मराठी कविता 'रातराणी'

बालमित्र
  वाणीवर संस्कार होण्यासाठी हे पाठ कराच
  मराठी सुविचार कोष, सर्वांसाठी!
  पोटधरून हसवण्यासाठी मराठी विनोद
शतायुषी
  कुशाग्र बुध्दी साठी, Dr. Santosh Jalukar
  आजोबांच्या बटव्यातील घरघुती औषधांचा खजाना
घडामोडी
  नविन मराठी कविता
  मराठीमाती टेलीव्हिजन लवकरच सुरु
मराठी लेख
  कुमार केतकर - अवतरली शिवशाही (लोकसत्ता)
  भारतातील `इंडिया'
  मराठी भाषेची उपेक्षा
  LEGAL PLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology