(ज़ुल काफ़िया - द्वि काफ़िया ग़ज़ल)
ठिणग्यांना फुटतात धुमारे,
ठिणग्यांना फुटतात धुमारे, बघता बघता
पुष्पांचे, बनतात निखारे, बघता बघता
संध्यास्नान कराया सविता, जळी उतरता
तिमिराचे, बसतात पहारे, बघता बघता
नित्य चालतो, खेळ ओहटी, अन् भरतीचा
जन्मतात, मरतात किनारे, बघता बघता
स्पर्श फुलतात, ओझरता वा, तशी कल्पना
अंगावर, फुलतात शहारे, बघता बघता
क्षणात सारे, चित्र बदलते, अपघाताने
जागेवर, विरतात निवारे, बघता बघता
नव्व्याण्णौ अपराधानंतर, घटका भरते
निजधामी, निघतात बिचारे, बघता बघता
बहर प्रितीला, येण्याचा हंगाम `इलाही'
नजरेचे, फुलतात इशारे, बघता बघता
|