पूर पाहिले अनेक आता,
पूर पाहिले अनेक आता, प्रलय बघू
परमवीर या मृत्यूचा, दिग्विजय बघू
कातरवेळी, अंधाराचा, उदय बघू
चक्रवाक पक्ष्यांचा नंतर, प्रणय बघू
शांत सरोवर, एक आरसा, बिंब दिसे
खडा टाकुनी, वलयामधुनी, वलय बघू
महान केल्या, व्यथा वंचना, प्रीतीने
काय नेमकी, विरह वेदना, उभय बघू
सहनशीलता, बघायची तर, धरतीची
बघायचा तर, आकाशाचा, विनय बघू
खेळ पुरेसा, खेळू आधी, शब्दांचा
वाटल्यास मग, आशय पाहू, विषय बघू
घडी घडीला, रंग बदलत्या, प्रीतीचे
भ्रमर फुलाची, अशीच काही, सवय बघू
लैला-मजनू, ज्योत पतंगांचे किस्से
आज `इलाही', चिरून अपुले, ह्रदय बघू
|