मुक्त्तक
आयुष्याशी, वाद घालणे, जमले नाही
अन् मृत्यूला, साद घालणे जमले नाही
जीवनवादी, मृत्यूवादी, वादी मीही
वाद, साद, फिर्याद घालणे, जमले नाही
न पटण्याचे, कोडे मजला,
न पटण्याचे, कोडे मजला, सुटले नाही
आयुष्याशी, कधीच माझे, पटले नाही
जी भ्रामकता, क्षितिजाची, ती अमुची होती
दोघांमधले, अंतर काही, मिटले नाही
सहनशीलता, सहनशीलता किती असावी
कसे म्हणावे, धरणीचे मन, विटले नाही
हात गुंफुनी, हाती दोघे, जिवलग डोंगर
दरीमुळेही, नाते त्यांचे, तुटले नाही
संशय आला, धरतीला का, आकाशाचा?
प्याल्यामध्ये, उगाच वादळ, उठले नाही
जितुका लुटता आला, तितुका सुगंध लुटला
पण वाऱ्याने, कळ्या फुलांना, लुटले नाही
अचंबीत ते, झाले माझ्या, होकारांनी
अफवांचे मग, पेव `इलाही' फुटले नाही
|