असे अचानक, काय जाहले,
असे अचानक, काय जहले, आयुष्याला?
बघता बघता, ग्रहण लागते, आयुष्याला
कशास त्याला चितेवरी ठेवले कळेना?
श्र्वासांनी, आधीच जाळले, आयुष्याला
कोणासंगे, कधीच त्याचे, पटले नाही
मृत्यूनेही, सहज टाळले, आयुष्याला
कार खायचा, भार धरेचा, तसेच काही
फुलापरी मी, कशास जपले, आयुष्याला
घरभेद्याचा, महिमा मजला, कळून चुकला
या ह्रदयाने, पळपळ छळले, आयुष्याला
कुणीतरी, सोडावा मागे, काळा पडदा
दिसू नये, काहीच मागले, आयुष्याला
हारजीत ठरलेली असते, जुगारामधे
या खेळावे, व्यसन लागते, आयुष्याला
सहनशीलता, कोठुन आणू, सांग `इलाही'
प्रीतीने, वेठीस बांधले, आयुष्याला
|