Aksharmanch

आनंदाश्रू

Marathi Kavita

सौ. स्वाती दळवी

तु जाशील तुझ्या घरी
आम्ही असु आमुच्या दारी
तु कवटाळशील स्वप्नांना उरी
तु राहशील आनंदात
नव्या सुखस्वप्नात रममाण
आम्ही मात्र राहु विरहात
स्वप्न भंगण्याच्या दुखा:त

जायचं होतच सोडून
जुनी नाती तोडून
मग प्रेम का केलसं भरभरुन

अंग अंगाखांद्यावर लोळलीस
मित्र मैत्रीणीत खेळलीस
जोडीदार मिळताच सार विसरलीस

आमच्याप्रमाणे काळजावर दगड ठेव
आम्हीही तुझ्या आठवणीलाच कवटाळू उरी
तुला सोबत करेल आमच्या प्रेमाची शिदोरी
पण तुला जावचं लागेल आमच्यापासून दुरी
तरीही माहेर- सासरला बांधुन ठेव घट्ट दोरी
बांधुन ठेव घट्ट दोरी ....

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony