marathi calendar marathi dinadarshika अक्षरमंच चे सभासद व्हा! ..(Click for Membership Form)

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   
Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articles Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language
Samwad - World of Words Maharashtra, Marathi Related News & Events in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language
MarathiMati - Home Aksharmanch
मराठीमाती डॉट कॉम / अक्षरमंच BACK | AKSHARMANCH HOME
Aksharmanch(अक्षरमंच) is Resource of Marathi Writers,Poets,Artist and Kavita,Charoli,Articles,Paintings(कविता,चारोळी,गझल,लेख,कथा) Print this page Print this Information | Send to your friends Send to Friends

आत्महत्या

दिवसभर कामाच्या व्यापाने वैगातून कसा बसा मी जरा दररोजपेक्षा अर्धा तास उशिराच घरी पोहोचलो होतो. बऱ्याच दिवसांपासून कामाच्या अति तणावामुळे व आर्थिक अडचणींमुळे मी तसा बायकोशी पाहिजे तेवढा बोललोच नव्हतो. स्वतःच्याच विचारात रात्र न झोपताच कशी निघून जायची याचे अक्षरशः मला भानच राहात नव्हते. तेव्हा आज आवर्जुन वेळात वेळ काढून जरा बायकोशी मनमोकळेपणाने गप्पा मारून डोक्यावरील तणाव कमी करायचा असा मनाशीच ठाम निश्चय करून घरी परतलो होतो. मुलगाही नशिबाने लवकर झोपला होता. पटापट हातपाय धुवून जेवण वाढायला सांगितले व बेडरूमध्ये कपडे बदलण्यास गेलो असता. अंग टाकावयास वाटलं तेव्हा मुलांच्याच बाजूला डोके उशीवर ठेवून शांतपणे पहुडलो. इतक्यात बेडरूमचा दरवाजा खोलून बायकोने आवाज दिला. ` काय हो, जेवता का लगेच की, थोडे पडता? जरा आराम भेटेल जीवाला. `ठीकआहे, ``जरा निवांत पडतो, मी एक सुस्कारा सोडून तिला सांगितलं आणि डोळे शांतपणे मिटून रिलॅक्सपणे पडलो.
अर्धवट काय ? जवळजवळ झोपेतच असताना दारावरची बेल अतिशय कर्कश आवाज करीत वाजली. कुणीतरी निरोप घेऊन आला होता. तो निरोप ऐकून बायको क्षणार्धात बेडरूममध्ये आली व अतिशय घाबरलेल्या आवाजात सांगू लागली की, अहो उठा! तयारी करा.. कुणीतरी आलंय, बघा काय म्हणतायेत.. शिलाने झोपेच्या गोळ्या खाल्यात... ओव्हरडोस घेतलाय अन तिच्या नवऱ्याने बेशुद्धा अवस्थेत हॉस्पिटलमएह्ये दाखल केलयं. तिची अवस्था क्रिटीकल आहे. अन त्यातून पण ती तुमचं नावं घेतेय... बघा जरा. मी दचकून उठलो अन तसाच बाहेर आलो. बाहेर माझा जुना मित्र सलीम आला होता, म्हटलं काय रे सलीम? काय नाटक आहे ? तसा तो उद्गारला, नाटक नही यार, जल्दी कर, अपून को हॉस्पिटल पहुचना है ! मी बायकोकडं पाहिले आणि पटकन कपडे घालून सलीमबरोबर हॉस्पिटल गाठले.
मला आलेला पाहून भाभी पुढे आली व माझा हातात हात धरून मला म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात भावजी. मला तर खूप भीती वाटत होती. आता जिवात जीव आला. भाभी म्हणजे माझा मित्र सलीमची बायको. तशी ती माझी अन शिलाची कॉमन फ्रेंड व आता तिने सलीमबरोबर लग्न केल्यामुळे आम्ही तिला प्रेमाने भाभी म्हणायचो. मी पोहोचण्याच्या अगोदरच शिलाची बहीण आली होती. दर्शना नवरे. तस पाहायला गेलो तर दर्शना शिलांपेक्षा वयाने खूप मोठी होती. परंतु दिसायला अतिशय कोमल व सडपातळ बांधा असल्यामुळे तिचे तारुण्य चारचौघात उठून दिसत होते. नवरे तिच्या सासरचं आडनाव. पण अडनावासारखे तिचे नवरे देखील तीन झाले होते आणि आज कुणी चौथाच व्यक्ती तिच्यासोबत आला होता. उधूनमधून ती त्या व्यक्तीबरोबर रागाने बघून काहीतरी पुटपुटत होती. मध्येच हळूच आवाजात काहीतरी सांगायची
मी आपला हातावर घडी घालून एका कोपऱ्यात शांतपणे मागील अतीत आठवत होतो, काय करावं? काय बोलावं? किंवा डॉक्टरांना भेटावं व विचारावं? काहीच सूचत नव्हते. शिला आता शेवटचे श्वास घेत आहे ही कल्पनाच मनाला अशक्यप्राय वाटत होती. तशी शिला मला खूपच आवडायची व दोन वर्षांपूर्वीच तिला मी लग्नाबद्दल विचारणा केली होती. परंतु तिच्या घरच्यांच्या विरोधामुळे व माझ्या शिक्षणामुळे मला ते शक्य झाले नाही> त्यामुळे दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकूर फुलत असताना मात्र घरच्यांच्या विरोधामुळे व तिच्या गह्रच्यांना तिच्या लग्नाची घाई असल्यामुळे तिचे प्रवीणबरोबर लग्न झाले होते. प्रवीण तिच्या नात्यातलाच होता. त्यामुळे त्यांचे लग्न ठरायला जास्त वेळ लागला नव्हता. परंतु त्यातूनही ती मला तूच हवा आहेस, हे सांगायला विसरली नव्हती.
त्यामुळे शिलाच्या आत्महत्येला मीच जबाबदार आहे. मी तिला अन तिच्या माझ्याबद्दलच्या प्रेमनावनेला समजून घेतलं असतं तर असं अघटीत घडलचं नसतं. असा विचार करून मी स्वतःलाच दोष देऊ लागलो होतो, त्या विचारातच असताना मी लगबगीने डॉक्टरांना भेटायला जाऊ लागलो. शिलाला वाचायला मला जे जमेल ते करण्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.
रॉय डॉक्टरांना भेटल्यावर माझी तळमळ व कासावीस पाहून डॉक्टरांचे, सुद्धा मन भरून आले व ते निःशब्दपणे माझ्याकडे पाहत इतकेच म्हणाले की, खरच, तिला हॉस्पिटलमध्ये आणल्या आणल्याच पंचनामा व पोलीस केस करण्याअगोदर तिचे मी उपचार सुरू केले असते तर कदाचित ती वाचली असती. खरा दोषी मीच आहे. योग्य वेळेला योग्य कामाची खबरदारी मला घेता आली नाही.
हे ऐकून शिलाचा नवरा प्रवीण मनातल्या मनात स्वतःला दोषी समजू लागला. त्याच्यामते शिलाने गोळ्या खाल्यांनतर लगेच हॉस्पिटलला तातडीनें आणले असते तर ... कदाचित डॉक्टरांच्या वेळेतच उपचार चालू झाले असते. मीच खर्च वाचवण्याच्या फंदात पडलो नसतो तर....उगीच छोट्यामोठ्या दवाखान्यात फिरवीत अर्धा-एक तास आधीच हॉस्पिटलला घेऊन आलो असतो तर... कदाचित डॉक्टरांच्या वेळेतच उपचार चालू झाले असते. मीच खर्च वाचवण्याच्या फंदात पडलो नसतो तर...
भाभी उगीच येरझाऱ्या घालत होती. अन मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. सर्व माझेच चुकले. मी तिच्या घरी मुक्कामाला यायलाच नको होतं. मुक्काम करण्याच्या हेतूने आली म्हणूनच मला माझ्या औषधाच्या गोळ्या सोबत आणाव्या लागल्या. त्या आणल्याच नसत्या अन टेबलावर तशाच ठेवल्याच नसत्या तर...
दर्शनाचे डोळे अश्रूंनी पाणावले होते. कारण तिला सांगून देखील तिने शिलाचे ऐकले नव्हते. कारण तिनं नवऱ्यांना सोडून पुन्हा एकदा ती चौथ्याबरोबर लग्नाचा विचार करत होती आणि हीच गोष्ट शिलाला पटतही नव्हती अन आवडतही नव्हती. साऱ्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या आई-वडिलांच हसू झालेलं पाहून शिलाला जगणचं नकोस झालं होतं त्यामुळे दर्शनाना वाटलं की आपल्या अशा वागण्यामुळेच शिलाने हा मार्ग पत्करला असावा. माझ्या बहिणीच्या मरणाला मीच जबाबदाअ आहे. कशाला पुन्हा लग्नाचा विचार केला ? शिला मी तुझी अपराधी आहे गऽऽ .. म्हणत दर्शना हुंदके देऊ लागली.
आता मात्र हॉस्पिटलमधील वातावरण निरागस झाले. सर्व जण आपापल्या विचारात.. रात्रीचा गर्द काळोख... अन पिन ड्रॉप सायलेंस.. बाहेर निःस्तब्धता.. अंधार काळोखात त्या काळोखाला छेद देणारे एक ट्यूबलाईटस.. मध्येच नर्स ... वॉर्डबाय.... ये.. जा करत होते.. सलीम अजूनपर्यंत आयसीयू मधून परतलाच नव्हता. नक्की काय झालंय ? शिलाने गोळ्या घेण्यापूर्वी कुणाचं कारण लिहून ठेवलंय की पोलीस पंचानामा करते वेळी कुणाचं नाव घेतलं असावं? आता उगीच आपण अडकू की काय ? या विवंचनेत सारे स्तब्धपणे आपापल्या जागेवर उभे होते. इतक्यात रात्रपाळीची नर्स कॉरीडोरमध्ये आली. तिच्या मागोमाग खाली मान घालून सलीम देखील आला.
शिलाआता शुद्धीवर आली आहे. तिच्या मागचा धोका डॉक्टरांच्या अतोनात प्रयत्नांमुळे टळला आहे. तसा सर्व जणांनी एकसाथ निःश्वास टाकला. शिला शुद्धीवर आली म्हणजे आपल्यावरची अपराधीपणाची बला टळली. तशी डॉ. रॉय यांनी सिगारेट पेटवली व जोराचा कश घेत लांब धुरांचे वलय सोडले. प्रवीणला तहानेची जाणीव झाली. भाभीला स्वतःची गोळी खाण्याची आठवण झाली. दर्शनाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले व मला ही घरी जाण्याची झाली.
शिलाला शुद्ध आल्यामुळे डॉक्टर रॉय घरी जायला निघाले. मग प्रवीणला भूक लागल्यामुळे तो घरी जेवायला गेला. सलीमला नवीनच लागलेल्या नोकरीमध्ये दांडी मारायला नको वाटलं म्हणून तो भाभीला शिलाजवळ बसण्यास सांगून घरी निघाला. दर्शनासुद्धा मग तिच्या चौथ्या नवऱ्यासोबत घरी जायला निघाली. सर्व निघालेले पाहून मग मीही निघाली.
जो तो आपपाल्या वाटेला लागला. आणि जिथे उरल्या फक्त दोघीजणी शिला पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर भाभी म्हणजे तिची खास मैत्रीण शितल तिला विसरू लागली. शिला का तू आत्महत्येचा प्रयत्न केलास? का झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतलास ? का जीवनाला वैगातलीस ? अगं तुझं नशीब बलवत्तर होतं म्हणूनच तू वाचलीस. नेमकं काय झालं तुला ठावूक आहे का ? मृत्यूला कवटाळायला पाहत होतीस ? शितल तिला गदगदा हलवत होती. तशी शिला बोलायला लागली आत्महत्या ? आणि मी ? वेड बिड लागलाय की काय.. अगं सोन्यासारखा नवरा माझा. एवढा सुखी संसार... उगीच अतीत आठवत जगण्यापेक्षा आत्महत्या करेल असं वाटला तुला ? अगं काल खूपच अर्धे डोके दुखायला लागले त्यामुळे मी जाम वैतागले होते. त्यात माझा मायग्रेनचा त्रास तर जुनाच आहे. अन तुलाही माहीत आहेच की, पण काल तो जास्तच असह्य वाटला आणि मी टेबलावरच्या माझ्या मायग्रेनच्या होमीओपॅथीच्या गोळ्या काढल्या अन अख्खी बॉटलच मायग्रेनच्या होमीओपॅथीच्या गोळ्या समजून तोंडात ओतल्यास आणि शितलने शिलाला घट्ट मिठ्ठीच मारली. खरचं शिलाने ज्यांना ज्यांना आपलं केलं होतं ते सगळेजण धोका टळल्यावर आपापल्या दिशेने परत फिरले होते. परंतु खरी मैत्रीण आज खरच मैत्रीला जागली होती. आणि इतक्यात माझ्या बायकोचा आवाज आला अहो ! जेवायचं की नाही आज ? की उपाशी़च झोपायचं तसा मी ताडकन जागा झालो !


Shantaram Karande, Mumbai, Maharashtra (India) - Profile

अक्षरमंचमध्ये नविन लिखान


अक्षमंचचे सभासद


मराठीमातीचे सभासद व्हा! (Click here to Join MarathiMati.com)
मराठी गझल
  Ilahi Jamadar - Marathi Ghazals इलाही जमादार - भावनांची वादळे
मराठी कविता
  एक बामण ढसाळलेला : मुकुंद शिंत्रे
अक्षरमंच
 

मराठी कविता 'रातराणी'

बालमित्र
  वाणीवर संस्कार होण्यासाठी हे पाठ कराच
  मराठी सुविचार कोष, सर्वांसाठी!
  पोटधरून हसवण्यासाठी मराठी विनोद
शतायुषी
  कुशाग्र बुध्दी साठी, Dr. Santosh Jalukar
  आजोबांच्या बटव्यातील घरघुती औषधांचा खजाना
घडामोडी
  नविन मराठी कविता
  मराठीमाती टेलीव्हिजन लवकरच सुरु
मराठी लेख
  कुमार केतकर - अवतरली शिवशाही (लोकसत्ता)
  भारतातील `इंडिया'
  मराठी भाषेची उपेक्षा
  PRIVACY | LEGAL PLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology
Channel Websites - MarathiMati™.net | MarathiMati™.org | MarathiMati™.tv | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com